ना. तनपुरेंच्या पक्षात कोणीही प्रवेश केला तरी त्यांचा पराभव अटळ - प्रहार जनशक्तीचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील.

ना. तनपुरेंच्या पक्षात कोणीही प्रवेश केला तरी त्यांचा पराभव अटळ - प्रहार जनशक्तीचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील.

ना. तनपुरेंच्या पक्षात कोणीही प्रवेश केला तरी त्यांचा पराभव अटळ- सुरेशराव लांबे पाटील

राहुरी प्रतिनिधी - राहुरी- नगर- पाथर्डी विधानसभा मतदार संघातुन तनपुरे यांना निवडुन येऊन अडीच वर्ष होत आलीत पण मतदार संघात कुठलेही भरीव कामे झाली नाहीत व जे काही किरकोळ रोडचे खडीकरणाचे कामे चालु आहेत तेही निकृष्ट दर्जाचे झाली आहे. फक्त माजी आ. शिवाजीराव कर्डीले व ना. प्राजक्त तनपुरेंनी एकमेकांवर टिकाटिपनी करुन मतदार संघातील शेतकरी व सर्व सामान्य मतदारांची दिशाभुल करुन त्यांचे प्रलंबित प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आपआपल्या सोईने राजकारण करण्यासाठी एकत्र येऊ पहात आहेत. तनपुरेंनी निवडणुकीत दिलेले आश्वसने पुर्ण करण्याचे सोडुन येणा-या नगर पालिका व जिल्हा परिषद, पंचायत निवडणुका समोर ठेऊन भाजप मधील असलेले प्रमुख कार्यकर्ते यांच्यावर दबाव टाकुन आपल्या पक्षात प्रवेश करण्यावर जास्त भर दिला आहे व माजी आमदार शिवाजी कर्डीले हेही पक्ष सोडणार असल्याची चर्चा ब-याच दिवसा पासुन दबक्या आवाजात होत आहे. ना. तनपुरेंच्या पक्षात कोणताही नेता व कितीही ईतर पक्षाचे कार्यकर्त्यांनी प्रवेश केला तरी येणा-या सर्व निवणुकांमध्ये ना. तनपुरेंचा पराभव अटळ आहे असा सुचक इशारा प्रहार जन शक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील यांनी बोलताना दिला.

लांबे पुढे बोलताना म्हणाले की, गेल्या दोन वर्षापासुन कोरोना व अतिवृष्टी या कारणांमुळे शेतकरी व सर्व सामान्य जनतेवर उपासमारीची वेळ आली. शेती उध्वस्त झाली. अशा प्रतिकुल परिस्थीतीत तनपुरे यांनी कुठलीही सुसज्ज आरोग्य सेवा व शासनाकडुन कोणतेच अनुदान मिळवून दिले नाही. उलट धरण पुर्ण क्षमतेने भरलेले असताना संपुर्ण रब्बी हंगाम संपत आला तेव्हा पाणी सोडले व ज्यां शेतक-यांच्या विहीर, बोअरवेलला पाणी असुनही ऊर्जा राज्यमंत्री तनपुरे यांनी महावितरण अधिकार्यांमार्फत थकीत वीज बिलाच्या नावाखाली स्वत: च्याच मतदारसंघातील शेतक-यांची चालु विद्युत पुरवठा बंद करुन 3 एच पी पंपाला 5 एच पी व 5 एच पी पंपाला 7.5 एच पी ची चुकीची आकारणी व अनेक कर लावुन चुकीची बिले देऊन त्या प्रमाणे सक्तीची विजबिल वसुलीसाठी पंधरा ते तीस दिवस डिप्या बंद करुन शेतक-यांचे कांदा, गहु, हरबरा ऊस जनावरांची चारापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले. शेतक-यांची आर्थीक परिस्थीती नसताना बिले वसुल केले. त्याचबरोबर कार्य क्षेत्रातील ऊसावर कारखान्याची मान्यता मिळवून प्रत्यक्षात बाहेरील ऊस आणुन कार्य क्षेत्रातील शेतकर्यांवर अन्याय केला. जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या तुलनेत कमी भाव दिला. हे सर्व शेतकरी कधीच विसरु शकत नाहीत, अनेकांना रब्बी हंगामात पाणी असुनही पिके करता आली नाही, सत्तेत नसताना ना. तनपुरे मा आ कर्डीलेंना हायमॅक्स आमदार म्हणायचे व हे फक्त नविन डिपीचे उद्घाटन करतात व जुन्या डिप्यांची लाईट बंद करुन जनता दरबार भरवतात व जाहीरात करतात. हा सर्व प्रकाराला राहुरी तालुक्यातील व राहुरी नगर पाथर्डी विधानसाभा मतदार संघातील शेतकरी व सर्व सामान्य जनता ओळखुन आहे गेल्या विधानसभेत विश्वासाने निवडुन देऊन त्यांच्यावर आत्महत्येची व पच्छातापाची वेळ आलेली आहे ते सुज्ञ मतदार पुन्हा विषाची परीक्षा घेणार नाहीत, व हे डिपी मंत्र्याचे फोटो मोबाईलच्या डिपीलाही लावायची ईच्छाही कोनाची राहीलेली नाही अशी माहिती लांबे यांनी दिली.

पुढे बोलताना लांबे म्हणाले येणा-या सर्व निवडणुकीत आम्ही समविचारी पक्ष संघटनांना बरोबर घेउन मतदारांना योग्य पर्याय देणार असल्याने सर्व सामान्य व शेतकरी वर्गातील मतदार आम्हाला नक्कीच निवडुन देईल असा विश्वास श्री लांबे पाटील यांनी व्यक्त केला.