केडगाव खून प्रकरणाचा उलगडा: अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून तिघे आरोपी जेरबंद

केडगाव खून प्रकरणाचा उलगडा: अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून तिघे आरोपी जेरबंद

केडगाव खून प्रकरणाचा उलगडा: अनोळखी मृतदेहाची ओळख पटवून तिघे आरोपी जेरबंद

प्रतिनिधी // प्रसाद घोगरे_९३७०३२८९४४.

अहिल्यानगर_दिनांक २२ जून रोजी केडगाव इंडस्ट्रियल एरियामधील नागछाप हिंग कंपनीच्या मोकळ्या जागेत एक अनोळखी इसम गंभीर जखमी अवस्थेत बेशुद्ध आढळून आला होता. त्याच्या अंगावर गंभीर मारहाणीच्या खुणा व जखमा दिसून आल्या. तत्काळ त्यास वैद्यकीय उपचारासाठी अहिल्यानगर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले.

या घटनेनंतर कोतवाली पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू म्हणून 88/2025 क्रमांकाने नोंद करण्यात आली. मात्र वैद्यकीय अहवालात मयतावर जाणीवपूर्वक टणक हत्याराने मारहाण झाल्याचे निदर्शनास आल्याने, अज्ञात व्यक्तीविरोधात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.

घटनेची गंभीरता लक्षात घेता मा. पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांनी घटनास्थळी भेट देत, स्थानिक गुन्हे शाखेला मृताची ओळख पटवून गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश दिले. पोनि. दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथक कार्यरत झाले.
तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी निष्पन्न

तपास पथकाने केडगाव ते कायनेटीक चौक या मार्गावरील २० ते २५ सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तीन संशयित आरोपींची नावे उघडकीस आली:

1. संदेश संजय क्षेत्रे (वय 25), रा. भुषणनगर, केडगाव

2. अमन असिरमिया शेख (वय 23), रा. शिवाजीनगर, केडगाव

3. मंगेश कालीदत्त कांबळे (वय 21), रा. भुषणनगर, केडगाव


दि. २४ जून रोजी पोलिसांनी तिघांनाही केडगाव परिसरातून अटक केली. मंगेश कांबळे याची झडती घेतली असता त्याच्याकडे मृत व्यक्तीचे आधारकार्ड मिळाले. त्यावरून मयताची ओळख बोबडा अनारसिंग (रा. सुखपुरी, जैनाबाद, बुरहानपूर, मध्यप्रदेश) अशी पटली.

लुटमारसाठी खून

पोलीस तपासात आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. दि. २२ जून रोजी मध्यरात्री आरोपी केडगावकडे मोपेडवर जात असताना रस्त्यावर उभ्या असलेल्या मृतास लुटण्याच्या उद्देशाने गाडीत बसवले. त्यास केडगाव इंडस्ट्रियल परिसरात नेत, मारहाण केली. त्याच्याकडील बॅग, रोख रक्कम व एटीएम कार्ड काढून घेतले. पीन विचारून एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला, मात्र पीन चुकीचा निघाल्याने पैसे निघाले नाहीत. यानंतर आरोपींनी रागाच्या भरात मृतास लाकडी काठी व दगडाने मारून ठार केले.

सध्या गुन्ह्याचा पुढील तपास कोतवाली पोलीस स्टेशन करीत आहे.