लोणी येथे लव्ह जिहाद चां प्रयत्न फसला : बजरंग दल आक्रमक.
बजरंग दलामुळे लोणीतील लव्ह जिहाद चां प्रयत्न फसला.
प्रतिनिधी : प्रसाद घोगरे..
लोणी परिसरात राहणाऱ्या एका हिंदू मातंग समाजातील 14 वर्षीय विद्यार्थिनीच्या छेडछाड व धमकी प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, शेजारी राहणाऱ्या समीर उर्फ नंद्या चाँद शेख हा जिहादी तरुण गेल्या काही दिवसांपासून विद्यार्थिनीची शाळेत ये-जा करताना तसेच घराजवळ छेडछाड करत होता. आज सकाळी सुमारे 9.45 वाजता मुलगी घराजवळील दुकानातून परत येत असताना संबंधित जिहादी तरुणाने तिचा रस्ता अडवून हात पकडत लग्नाची मागणी केली. मुलीने नकार दिल्यानंतर तिला जिवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद आहे.
घटनेची माहिती मुलीने कुटुंबीयांना दिल्यानंतर त्यांनी संबंधित तरुणास जाब विचारला. यावेळी वाद झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर कुटुंबीयांनी बजरंग दलाच्या मदतीने लोणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत आरोपीविरुद्ध POCSO कायदा, विनयभंग तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये आणि इतर संबंधित कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, बजरंग दल व कुटुंबीयांनी सदर प्रकार लव्ह जिहाद चां असल्याचे सांगितले असून, हिंदुत्ववादी संघटनांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुलीच्या धाडसाचे कौतुक..
घटनेनंतर संबंधित विद्यार्थिनीने कोणतीही भीती न बाळगता तत्काळ हा प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यामुळे तिच्या धाडसाचे परिसरात कौतुक होत आहे. तसेच कुटुंबीयांनीही तातडीने पोलिसांकडे धाव घेत कायदेशीर मार्ग स्वीकारल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले जात आहे. दरम्यान, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांना धीर देत गुन्हा दाखल करण्यासाठी आवश्यक मदत केल्याबद्दल पिडीत कुटुंबांनी त्यांचे आभार व्यक्त केले आहे.








