राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना त्याग ,समर्पण,समाजसेवा व देश सेवेचा मंत्र देतात- प्रा. डॉ.महावीरसिंग चौहान

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना त्याग ,समर्पण,समाजसेवा व देश सेवेचा मंत्र देतात- प्रा. डॉ.महावीरसिंग  चौहान

राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांना त्याग, समर्पण, समाजसेवा व देशसेवेचा मंत्र देतात : प्रा.डाॅ.महावीरसिंग चौहान

 

राहुरी:

             महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरी येथील राष्ट्रीय सेवा योजना व विद्यार्थी कल्याण कार्यालयाने राष्ट्रीय सेवा योजनेचा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा केला . या दिनाचे औचित्य साधून 26 जानेवारी 2025 मध्ये मुंबई व दिल्ली येथे होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या परेड मध्ये सहभागी होण्यासाठी दहा जिल्ह्यातील स्वयंसेवकांमधून एक स्वयंसेवक व एक स्वयंसेविकेची निवड करण्यात आली .याप्रसंगी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यार्थी कल्याण अधिकारी 

            प्रा डाॅ.महावीरसिंग चौहान यांनी सांगितले कि स्वयंसेवकांनी त्याग समर्पण, समाजसेवा व देशसेवेचा मंत्र घेऊन काम करावे व महाविद्यालयीन जीवनात युवकांना संस्कार संस्कृतीची आठवणही डाॅ चौहान यांनी करून दिली. स्वयंसेवकांनी निस्वार्थपणे तन मन धनाने राष्ट्रीय सेवा योजनेची समाजोपयोगी कामे वर्षभर नियमित कार्यक्रमांद्वारे व सात दिवस खेडेगावात राहुन विशेष शिबिरांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील शेतकरी शेतमजूर व गावक-यांना शेतीविषयक तांत्रिक माहीती देऊन अंधश्रध्दा निर्मुलन करण्यासाठी जनजागृती करून गाव दत्तक घेऊन निस्वार्थ भावनेने देशसेवा केली पाहीजे तरच राष्ट्रीय सेवा योजनेचे उद्दीष्ट व उद्देश साध्य होऊ शकेल व हे वरीलप्रमाणे कार्य सर्व कार्यक्रम अधिका-यांनी स्वयंसेवकांनी विद्यापिठाचे सन्माननीय कुलगुरू डाॅ प्रशांतकुमार पाटील यांच्या पाठींब्याने मार्गदर्शनाने करवून घेतल्यानेच महात्मा फुले कृषी विद्यापिठ राहुरीला 2023-24 चा महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट विद्यापिठ म्हणून व सर्वोत्कृष्ट संचालक म्हणून डाॅ.महावीरसिंग चौहान याच्यासह एक कार्यक्रम अधिकारी प्रा.संदीप तांबे व सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक शुभम पोळ यांना जाहीर झाला असल्याचे प्रा डाॅ.महावीरसिंग चौहान यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या वर्धापनदिनानिमित्त केले . यावेळी मध्यवर्ती परिसर राहुरी येथे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील विविध कृषी संलग्न महाविद्यालयातून 26 जानेवारी 2025 मध्ये मुंबई व दिल्ली येथे होणा-या प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये सहभागी होण्यासाठी आलेल्या स्वयंसेवक व स्वयंसेविकांची उपस्थिती होती . दहा जिल्ह्यातील स्वयंसेवक मूले मूली यामधून वजन ,उंची, रनिंग, परेड नाट्य, गीतसंगित , नृत्ये , वादन, वकृत्व व व्यक्तीमत्व विकास या विविध चाचणीतून एक स्वयंसेवक व एक स्वयंसेविकांची पारदर्शीपणे निवड करण्यात आली यामध्ये राजश्री शाहु महाराज कृषी महाविद्यालय कोल्हापुरचा स्वयंसेवक कुमार मासाळ प्रसाद मधुकर व कु.तानवडे पुनम बाळू , कृषीजैवतंत्रज्ञान महाविद्यालय बारामती या स्वयंसेविकेची निवड करण्यात आली .

              या निवडीबद्दल विद्यापिठाचे सन्माननीय कुलगुरू डाॅ प्रशांतकुमार पाटील ,अधिष्ठाता डाॅ.दिलीप पवार , संचालक रा.से.यो.तथा विद्यार्थी कल्याण डाॅ.महावीरसिंग चौहान व क्रिडाधिकारी डाॅ.विलास आवारी यांनी निवड झालेल्या दोन्ही स्वयंसेवकांचे अभिनंदन केले आहे.निवड समितीचे परिक्षक म्हणून डाॅ.अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय राहुरीचे विभागप्रमुख तथा रा.से.यो. कार्यक्रम अधिकारी डाॅ.कैलास कांबळे, एन.सी.सी कॅप्टन डाॅ सुनिल फुलसावंगे , क्रिडाधिकारी डाॅ.विलास आवारी व सहाय्यक अधिक्षिका श्रीमती अर्चना टकले यांनी परीक्षण केले. रासेयो दिन साजरा करण्यासाठी व आर डी परेड स्वयंसेवक निवडीसाठी विद्यार्थी कल्याण कार्यालयाचे कर्मचारी सर्वश्री दिनेश भालेराव , आकाश साळवे, चांगदेव दातीर बापुसाहेब गवते, ॠषी कदम , सागर नन्नावरे , श्री बंडू तांबे , भास्कर भिंगारदे व सुनिल बर्डे यांनी सहकार्य केले.