नेवासा तालुक्यात खुणेगावत कृषी दूतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नेवासा तालुक्यात खुणेगावत कृषी दूतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

नेवासा तालुक्यातील खुणेगावात 

कृषिदूतांचे शेतकऱ्यांना मार्गदर्शन

 

-- 

नेवासा, (ता. २३) ः सोनई येथील कृषि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नेवासे तालुक्यातील खुणेगाव येथे आभ्यास दौरा केला. या कृषिदूतांनी तेथील शेतकऱ्यांना शेतीविषयी माहिती देत तेथील पिकांची पाहणी केली. या कृषिदूतांचे ग्रामपंचायतीच्यावतीने स्वागत करण्यात आले.

 

मुळा एजुकेशन सोसायटी व महात्मा फुले कृषि विद्यापीठ संलग्नीत सोनई येथील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेणारे सहा कृषिदूत खुणेगावला आभ्यास दौऱ्यावर गेले आहेत. प्राचार्य डॉ. हरी मोरे, उपप्राचार्य बोरुडे सर, कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संतोष चौगुले, प्रा. एस. एन. दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली ते काम करत आहेत. कृषिदूत हितेश सोनवणे , किरण पवार , राजरत्न मेहेरखांब, शुभम लांडगे , रोहित पवार , सागर शर्मा यांनी शेती विषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले. खुणेगाव येथील शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेत त्यांना शेती, माती, कीड, रोग आदींविषयी मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित खुणेगावच्या सरपंच छाया भाऊसाहेब काळे, उपरपंच भाऊसाहेब कदम, ग्रामसेवक मीनाक्षी वाणी, भाऊसाहेब काळे, अशोक कदम, मनोहर कदम, सूर्यभान पवार, आबासाहेब कदम, किरण कदम, यादव गायकवाड, उत्तम पंडित, पंढरीनाथ पवार आदी उपस्थित होते.