पावन महागणपती देवस्थानला हजारो भाविकांची मांदियाळी परिसर दुमदुमला.
*पावन महागणपती देवस्थानला हजारो भाविकांची मांदियाळी. परिसर दुमदुमला.*
नेवासा (प्रतिनिधी युनूस पठाण) :- नेवासा तालुक्यातील देडगाव ,पाचुंदा, माका, म.ल .हिवरा या परिसरातील पावन महागणपती देवस्थान येथे उत्सव सोहळा शांतीब्रह्म भास्करगिरी महाराज, स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, महंत आदिनाथ महाराज शास्त्री ,महंत सुनीलगिरी महाराज ,ह भ प सुखदेव महाराज मुंगसे , ह भ प सदाशिव महाराज पुंड, यांच्या आशीर्वादाने सुरू असून येथे महाराष्ट्र भरातून भाविक दर्शनासाठी येत आहे. दररोज महाआरतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.

विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन केलेले असून दिनांक 3 रोजी परिसरातील नामांकित युवा कीर्तनकार ह भ प प्रदीप महाराज वाघमोडे श्री क्षेत्र पाचुंदा यांचे हजारो भाविकांच्या उपस्थितीत त्यांच्या मधुर आवाजातून ,सुंदर गायनातून, मृदुंगाच्या वादनातून ,अन गायकांच्या गायनातून, पेटीच्या सुरामधुन कीर्तन रुपी सेवा पार पडली. यावेळी महाराजांनी विघ्नहर्तेची देवता गणपतीची पूजा केल्याने जीवनात काही कमी पडत नाही. जीवन जगत असताना आपण नियतीने जगावे व आपल्या आई-वडिलांची मनोभावे पूजा करावी जीवनात काही कमी पडणार नाही .अशा अनेक विषयावर कीर्तन रुपी सेवा दिली.

पावन महागणपती देवस्थान हे परिसरातील प्रख्यात असून दर महिन्याला चतुर्थी निमित्त भोजनाची व्यवस्था, भजन कीर्तन अनेक शाळांची पर्यटन स्थळ म्हणून सहली या परिसरामध्ये विविध वृक्षांची लागवड केलेली असून हा परिसर निसर्ग रम्य वातावरणात शोभून दिसतो जणू काही हिरवी शालच या परिसराने पांघरली आहे. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये तर मनमोहक वातावरणामध्ये पर्यटक व भाविक या देवस्थानच्या भेटीला भेट देण्यासाठी येत असतात .विविध उपक्रमांनी वर्षभर सोहळे गजबजून जात असतात .तसाच हा उत्सव गजबजून जात आहे. या देवस्थानला माजी खासदार सदाशिव लोखंडे व माजी आमदार शंकरराव गडाख यांच्या विशेष प्रयत्नातून भव्य दिव्य सभा मंडप साकारलेले असून त्या ठिकाणी लग्न सोहळे व विविध कार्य पार पडत असतात.

हा सोहळा यशस्वी त्या पार पडण्यासाठी देडगाव माका पाचुंदा परिसरातील भजनी मंडळ व देवस्थानचे सर्व अध्यक्ष व सदस्य कष्ट घेत अनमोल सहकार्य करत आहेत. या उत्सव काळात दररोज अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे.
तर दिनांक 6 रोजी सकाळी 9 ते 11 या वेळेत युवा कीर्तनकार ह भ प बाबासाहेब महाराज मतकर यांचे काल्याचे किर्तन होणार आहे .तरी जास्तीत जास्त भाविकांनी लाभ घ्यावा हे आवाहन करण्यात आले आहे.








