राज्य सरकारी व निमसरकारी कर्मचाऱ्यांचा दोन दिवस राज्यव्यापी लाक्षणिक संप .संपामध्ये राहुरी तालुका महसूल कर्मचारी संघटनेचा सक्रिय सहभाग .

महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या दोनदिवसीय राज्यव्यापी संपामध्ये राहुरी तालुका महसूल कर्मचारी संघटनेने सक्रिय सहभाग घेतला आहे .दिनांक 23 व 24 फेब्रुवारी या दोन दिवसात राज्यभर सरकारी व निमसरकारी ,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा लाक्षणिक संप सुरू आहे . गेल्या दोन वर्षांपासून महसूल विभाग ,शिक्षण विभाग व आरोग्य विभाग हे कोरोणाच्या काळामध्ये सक्षम पणे सक्रिय सहभाग घेऊन नागरिकांना मदत करत आहे परंतु या कर्मचाऱ्यांच्या मागण्या शासन दरबारी कोरणा काळामध्ये प्रलंबित पडल्या आहेत . आता कोरोणाचा प्रभाव कमी झाला असून आमच्या सर्व मागण्या शासनाने मंजूर कराव्यात असे कर्मचाऱ्यांचे मत आहे .राज्यभरातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याबरोबरच राज्यातील महसूल विभागही या संपामध्ये सामील झाला आहे .राहुरी तालुक्यातील महसूल कर्मचारीसंघटनेने एकूण 28 मागण्यांचे पत्र व संपाचे सह्या सहित निवेदन नायब तहसीलदार श्रीमती दंडीले यांच्याकडे दिले आहे .