बहुजन विकास कृती समितिच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती साजरी - भारतिय पत्रकार संघटण जिल्हा प्रवक्ता आर आर जाधव
*बहुजन विकास कृती समितीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची जयंती उत्साहात साजरी*
वरवंडी ता. राहुरी येथे बहुजन विकास कृती समितीच्या वतीने राष्ट्रसंत गाडगे महाराज यांची 146 वी जयंती गाडगे महाराज आश्रम शाळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करून महाराजांच्या विचारांना आणि स्मृतींना विनम्र अभिवादन करण्यात आले. सदर अभिवादन कार्यक्रम साठी ज्येष्ठ पत्रकार रमेश जाधव काका, माजी ग्रामपंचायत सदस्य राजू पवार, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका उपाध्यक्ष जालिंदर अडसूरे, प्रगतशील शेतकरी कैलास पवार, इंडिया फ्रूट चे मालक सलमान शेख, युवा नेते नारायण शिंदे, जय मल्हार ब्रोस बँड आणि डिजे चे मालक बंडू भालेराव, राज टेलर्स चे आकाश अडसुरे आणि राहुल आडसुरे, ग्रामपंचायत सदस्य जगदीश भालेराव, रवींद्र भालेराव, सुनील भालेराव तसेच गाडगे महाराज आश्रम शाळेचे अधीक्षक भुजबळ सर आणि खडसे सर उपस्थित होते.
बहुजन विकास कृती समिती चे बहुतांश जण सदस्य हे गाडगे महाराज आश्रम शाळेचे माजी विद्यार्थी असल्याने शाळा व्यवस्थापन समितीला सहकार्य करू, शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी आणि भटक्या विमुक्त जमातीच्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रामाणिक प्रयत्न करू असे आश्वासन दिले. कोरोना काळात शिक्षणाची पूर्णतः हेळसांड झालेली आहे, कोरोना ही न संपणारी प्रक्रिया असल्याने आवश्यक ती खबरदारी घेऊन शाळा सुरूच ठेवली पाहिजे आणि शिक्षणाबाबत कोणतेही दुर्लक्ष होता कामा नये याबाबत चर्चा करण्यात आली. शेवटी शाळेतील काही छोट्या मुलांना बिस्कीट वाटप करून अभिवादन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.