माझ्यासाठी उद्घाटन थांबू नका,ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन करून पुलाच्या कामाला सुरुवात करण्याचे आ. तनपुरे यांनी दिले आदेश,पुलाच्या कामासाठी 30 लाखांचा निधी,ग्रामस्थांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.
राहुरी तालुक्यातील पिंप्री अवघड येथे अनेक वर्षापासून प्रलंबित असलेल्या पिंप्री -सडे रस्त्यावरील देवनदीच्या पुलाच्या कामास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी 30 लाख रुपये निधी देऊन पुलाचा प्रश्न मार्गी लावल्याने या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्या शेतकऱ्यांनी व नागरिकांनी आमदार तनपुरे यांचे अभिनंदन केले आहे . या पूलाचे भूमिपूजन आ . तनपुरे यांच्या हस्ते होणार होते परंतू अनेक विकास कामांमुळे व्यस्त असल्याने माझ्यासाठी भूमिपूजनाचा कार्यक्रम थांबवू नका,गावातील सरपंच व ग्रामस्थांच्या हस्ते उद्घाटन करून कामाला सुरुवात करा असा मनाचा मोठेपणा त्यांनी दाखवून दिला आहे .त्यांच्या सूचनेनुसार नदीवरील पुलाच्या कामाचे भूमिपूजन सर्व ग्रामस्तांच्या उपस्थितित सरपंच प्रियंका बर्डे यांच्या हस्ते करण्यात आले असून लगेचच पुलाच्या कामास सुरुवात करण्यात येणार आहे .
पिंप्री अवघड - सडे ग्रामीण मार्ग क्र .133 या रस्त्यावरून जाताना देवनदीचा प्रवाह येत असल्याने पावसाळ्यात या नदिला महापूर येत असतो . या काळात आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना व शेतकऱ्यांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत असे . पाणी कमी झाल्यानंतर अनेक वेळा लोकवर्गणी गोळा करून जाण्या येण्यासाठी रस्ता तयार करावा लागत असल्याने येथील नागरिक त्रस्त झाले होते . त्यांच्या समस्या जाणून घेऊन आ . तनपुरे यांनी दखल घेऊन या समस्याचे निराकरण केल्याने परिसरातील नागरिकांनी आनंद व्यक्त करून शुभेच्छाही दिल्या आहेत .
आ . प्राजक्त तनपुरे यांनी पिंप्री अवघड गावामध्ये अनेक विकासकामे मार्गी लावली असून सुमारे सव्वा ते दीड कोटींचा निधी देऊन विकासकामांचा धडाका लावला आहे .अनेक वर्षाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे .येण्या जाण्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या पुलाचे काम लवकर सुरू होणार असल्याने या पुलाच्या भूमिपूजनासाठी पिंप्री अवघड गावातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते .आमदार तनपुरे या पुलाच्या भूमिपूजनासाठी उपस्थित राहून न शकल्याने त्यांच्या सूचनेनुसार सरपंच प्रियंका बर्डे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले गावातील अनेक मान्यवरांनीही यावेळी या कामाचे पूजन केले .या कार्यक्रमासाठी माजी सरपंच श्रीकांत बाचकर, विजय कांबळे,तनपुरे समर्थक सुरेश उर्फ गोपी लांबे, शिवाजी लांबे,ज्येष्ठ नागरिक आदिनाथ दोंड ,सदाशिव लांबे, सूर्यभान दोंड,संजय लांबे, बाबासाहेब गायकवाड, गुजीनाथ सोडनर,जगन्नाथ गायकवाड, मोहन बर्डे,रवींद्र साळुंके, गणेश ,वसंत लांबे, जालिंदर पवार, अंबादास गटकळ, विजय पवार सह अनेक मान्यवर उपस्थित होते .