श्रीराम नवमी निमीत्त रामभाऊ यात्रा उत्सव आनंदात साजरा. जमली हजारो भाविकांची मांदियाळी
बालाजी देडगाव (प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री. क्षेत्र रामभाऊ देवस्थान (जळगाव रोड) येथील यात्रा उत्सव मोठ्या आनंदात साजरा झाला.
दरवर्षीप्रमाणे या देवस्थानला पैठण येथून गंगेचे कावडीचे पाणी आणले जाते व त्याचे जंगी स्वागत केले गेले. तसेच कावडीची फटाक्याच्या आतषबाजी मध्ये मोठी मिरवणूक काढण्यात आली.
दिवसभर नगर जिल्ह्यातून भावीक भक्त दर्शनासाठी आले होते. तर सायंकाळी व्हईकाचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला व नंतर महाआरती करण्यात आली .या आरतीला हजारो भाविकांचीं मांदियाळी जमली होती. या देवस्थानला पुरातन काळा पासून गुळाची शेरणीचा मान आहे. तर नंतर लगेचच महाप्रसादाची पंगत झाली. हजारो भाविकांनी महाप्रसादच्या पंगतीचा लाभ घेतला.
यावेळी अहमदनगर जिल्ह्यातून भाविक येऊन दर्शनाचा व महाप्रसादाचा आनंद घेतला तर हे रामभाऊ देवस्थान नवसाला पावणारे आहे .अशी पुरातन आख्यायिका आहे. त्यामूळे उत्सव दिवसेंदिवस मोठ्या ग्रामस्थ मोठ्या उत्साहात साजरा करत आहेत.