नगर मनमाड महामार्गावरती पुन्हा भिषण अपघात ट्रक व दुचाकी अपघात होऊन एकाचा मृत्यू ,तर एक गंभीर जखमी

नगर मनमाड महामार्गावरती पुन्हा  भिषण अपघात ट्रक व दुचाकी अपघात होऊन एकाचा मृत्यू ,तर एक गंभीर जखमी

नगर मनमाड महामार्गावार भीषण अपघात दुचाकी ट्रक धडकेत एकाचा मृत्यू

राहुरी ला प्रती डॉ देवेंद्र शिंदे

. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द या ठिकाणी नगर-मनमाड महामार्गावर साई मंदिराजवळ दुचाकी क्रमांक mh 17 D.A 4648 आणि समोरून येणाऱ्या ट्रक क्रमांक TN 30 CF 1305 या दोन वाहणाची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोन्ही तरुण रस्त्यावर फेकले गेल्याने एकाचा मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात दुचाकीवरील दिनेश शिवराम चौहान हा तरुण जागीच ठार झाला तर

धिनिया तुळाराम चौहान हा तरुण गंभीर जखमी झाल्याचं समजतंय. मूर्ती बनविण्याचा त्याचा व्यवसाय असल्याचं ही कळतंय. दरम्यान, अपघात घडताच, स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जीवनदायी रुग्णवा

हिकेचे निखिल भोसले यांना संपर्क साधण्यात आला, असता त्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात त्यांना दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी एका तरुणाला मृत घोषित केलं. दुसऱ्या जखमी तरुणावर सध्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती गंभीर असल्याचं समजतंय. दरम्यान, अपघातानंतर नगर-मनमाड महामार्गावर काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.