खडांबे खुर्द येथील 52 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविली

खडांबे खुर्द येथील 52 वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपली जिवन यात्रा संपविली

राहुरी प्रतिनिधी- डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथील एका ५२ वर्षीय व्यक्तीने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली. विनायक पुंजाराम पारे, वय ५२ वर्षे, रा. खडांबे खुर्द, ता. राहुरी असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी पहाटे २.४५ वाजेच्या सुमारास विनायक पारे यांनी राहत्या घरी गळफास घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांना तातडीने वांबोरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना तपासून उपचारा पूर्वीच मृत घोषित केले.​

          या घटनेची माहिती मिळताच राहुरी पोलीस ठाण्याचे स. फौ. बबन राठोड यांनी रुग्णालयात धाव घेऊन पंचनामा केला. या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या घटनेमुळे खडांबे खुर्द परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली स. फौ. बबन राठोड करत आहेत.