अयोध्येतील प्रभू श्रीरामांच्या मंदिर प्रतिष्ठापने निमित्त हरिहर केशव गोविंद बना मध्ये लोटला जनसागर.
22 जानेवारी 2024 रोजी आयोध्या मधील राम मंदिराच्या प्रतिष्ठापणे निमित्त बेलापूर् खु येथे हरिहर केशव गोविंद बनामध्ये अनेक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी आठ वाजता प्रभू श्रीरामांच्या भव्य वीस फुटी कट आउट ला पुष्पहार घालून पूजन करून भव्य अशी मोटरसायकल रॅलीचे आयोजन् करण्यात् आले होते. हरिहर केशव गोविंदांच्या तीनही स्थळांवर म्हणजेच उक्कलगाव , बेलापूर बुद्रुक आणि केशव गोविंद बन या ठिकाणी त्रिस्थळी दर्शनासाठी भेट देण्यातआली. यावेळी सुमारे 200 मोटरसायकलची भव्य अशी ही रॅली निघाली. यामध्ये तरुण ,जेष्ठ तसेच महिला वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. तरुण युवया युवतीनी पौराणीक वस्त्र परिधान करत प्रभु श्रीराम लक्ष्मण सिता व हनुमानाची वेशभूषा करुन जिवंत देखावा केला . यावेळी अनेक जण भजन म्हणत जीप टेम्पो आणि ऑटो रिक्षातून यामध्ये सहभागी झाले. सुमारे साडेपाचशे भाविकांनी या रॅलीत भाग घेतला .उक्कलगाव येथे माजी सरपंच नितीन थोरात तसेच इतर ग्रामस्थ यांनी या रॅलीचे स्वागत केलं. उक्कलगाव येथील हरिहर केशव गोविंद मंदिरामध्ये दर्शन घेऊन ही रॅली अतिशय नियोजनबद्धपणे बेलापूर बुद्रुक कडे मार्गस्थ झाली. बेलापुरातील झेंडा चौकात या रॅलीचे भव्य असे स्वागत करण्यात आलं. यावेळी खासदार सदाशिवराव लोखंडे यांनी या रॅलीचे स्वागत केले , त्यांच्या समवेत सुधीरजी नवले तसेच पत्रकार देविदास देसाई आणि इतरही मान्यवर उपस्थित होते. येथून ही रॅली केशव गोविंद मंदिर बेलापूर बुद्रुक येथे आली . या तीनही मंदिरांच्या ठिकाणी पारंपारिक वाद्य डफाच्या ठेक्यावर तरुणांनी लयबद्ध वैशिष्टपूर्ण नृत्य केले आणि अनेक कवणें ( जुनी अध्यात्मीक ईश्वराचे लीलावर्णन असलेली चार ओळी ) सादर केली ज्यामध्ये प्रभू श्रीरामांचे लीलांचे वर्णन होते. यानंतर ही रॅली पुन्हा एकदा केशव गोविंद बनामध्ये आली यानंतर प्रसादाच वाटप होऊन भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आलं होतं. डॉक्टर जोंधळे ब्लड बँक च्या वतीने हे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी सुमारे 30 भाविकांनी रक्तदान केलं. हरिहर केशव गोविंद बनातील मंदिराच्या सभा मंडपात भव्य असा श्रीरामयाग यज्ञ सुमारे 11 जोडप्यांच्या हस्ते पार पडला. यानंतर सायंकाळी पाच वाजता अबाल वृद्ध तसेच तरुण आणि लहान मुलं यांनी सुमारे पाच हजार पणत्या मंदिराच्या प्रांगणामध्ये वेगवेगळ्या आकारांमध्ये रचत भव्य दीपोत्सव साजरा केला. यामध्ये प्रभू श्रीरामांच्या नावाच्या भव्य आकारात पणत्या लावण्यात आल्या . मोठया धनुष्यबाण, स्वस्तिक ,ओमकार इत्यादी आकारांमध्ये पणत्या सजवण्यात आल्या . पणत्या पेटवल्यानंतर संपूर्ण परिसरामधील इलेक्ट्रिक दिवे विझविण्यात आले आणि हा संपूर्ण परिसर पण त्यांच्या मंत्रमुग्ध करणाऱ्या लखलखाटामध्ये उजळून निघाला .यावेळी महिलांनी आणि मुलींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला. एक प्रकाराचा आनंदाचे उधाण यावेळी या परिसरात आल्याची जाणीव झाली. यावेळी हरिहर केशव गोविंदाचा जप,हनुमान चालीसा आणि प्रभू श्रीरामांचा जप करण्यात आला . प्रभू श्रीरामांच्या जयघोशांमध्ये सुंदर आणि मनोहर अशी फटाक्यांची आतषबाजीने या कार्यक्रमाची सांगता झाली
या कार्यक्रमात तरुण , शाळकरी मुलं आणी महिलांचा सहभाग लक्षणीय होता .हरिहर केशव गोविंद मंदिराच्या ट्रस्टच्या सहकार्याने पार पडलेल्या या अनोख्या कार्यक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. यावेळी हरिहर ट्रस्ट तसेच सर्वांचे भाविकांचे आभार मानण्यात आले.