मराठीअभिनेता राहुल सोलापूरकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला रिपाईच्या वतीने जोडे मारो आंदोलन.

मराठीअभिनेता राहुल सोलापूरकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला रिपाईच्या वतीने जोडे मारो आंदोलन.

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) :- रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली मराठी अभिनेता राहुल सोलापूरकरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याला खेटराची माळ घालून रिपाईच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात आले शहरातील रेल्वे स्टेशन समोर डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकासमोर रिपाईचे कार्यकर्ते जमा होऊन अभिनेता राहुल सोलापूरकर याच्या विरोधात घोषणाबाजी करून त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीचे निवेदन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश जाधव यांना देताना रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष दादा त्रिभुवन  मातंग आघाडीचे जिल्हाध्यक्ष  मोहन आव्हाड जिल्हा उपाध्यक्ष योगेश बनसोडे युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर अमित काळे आदींच्या हस्ते निवेदन देण्यात आले त्यावेळी सुभाष त्रिभुवन म्हणाले की युट्युबच्या  पॉडकास्ट कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून अभिनेते राहूल सोलापूरकर यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या च्या पायावर नाक घासून सबंध शिवप्रेमींची जाहीर माफी मागावी तसेच भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर विश्वस्त पदावरून त्यांना हटवण्यात यावे अन्यथा राहुल सोलापूरकर दिसेल तिथे त्याच्या तोंडाला काळे फासण्यात येईल असा इशाराही सुभाष त्रिभुवन यांनी दिला सुनील  मोहन आव्हाड म्हणाले की महापुरुषांचा अवमान करणाऱ्या अपप्रवृत्तीला वेळीच भर चौकात ठेचले पाहिजे त्यावेळी रिपाईच्या सोनू राठोड प्रशांत अमोलीक अर्जुन  शेजवळ आकाश पठारे अशोक शेळके राहुल  भालेराव अमोल बोधक आधी उपस्थित होते.