विद्यापिठ कार्यक्षेत्रात आदर्शगाव च्या इमारतीच्या जून्या किंमती साहित्याची चोरी, या प्रकराबाबत ... तेरी भी चूप मेरी भी चूप .

विद्यापिठ कार्यक्षेत्रात आदर्शगाव च्या इमारतीच्या जून्या किंमती साहित्याची चोरी, या प्रकराबाबत ... तेरी भी चूप मेरी भी चूप .

संपूर्ण भारत देशात नाव लौकीक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील म.फु.कृ.विद्यापीठ कार्यक्षेत्रात असलेले आदर्शगाव पोपटराव पवार यांचे निधीअंतर्गत योजणेच्या जुण्या इमारतीची सागवाण लाकडे पत्रे खिडक्या दरवाजे यांची चोरी करून किंमती माल गायब करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. संबंधीत ठेकेदाराने कुलसचिव यांची कुठलीही पूर्व परवानगी न घेता हा जुना सागवाणी माल चोरून नेला आहे. बऱ्याच दिवसांपासून इमारत दुरुस्तीचे काम सुरू आहे परंतू जून्या साहित्या बाबत कोणत्याही अधिकाऱ्याने दखल का घेतली नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे . या घटनेची

माहिती समजताच पत्रकार बंधूने ठेकेदाराने मटेरियल लपवून ठेवलेल्या ठिकाणी प्रत्यक्षात जावून शुटींग व फोटो काढून घेतले व या पुराव्यासहित विद्यापीठ अधिकार्‍यांना या चोरीबाबत माहिती विचारली परंतू त्यांनी या संबंधीत ठेकेदारास कुठल्याही प्रकारचे मटेरिल घेवून जाण्यास कागदोपत्री सांगीतले नसल्याचे सांगीतले आहे.

तसेच सदरच्या कामावर असलेले बांधकाम शाखेतील इंजिनियर यांनी ही जुने मटेरीयल जमा केले नसल्याचे समजते . या जुण्या इमारतीचे सागवाणी मटेरियल चोरी गेलेली फिर्याद सुद्धा दिली नसलेचे समजते. याचा अर्थ ठेकेदार व संबंधीत अधिकारी यांच्या संगनमतानेच जुने किंमती साहित्य ठेकेदाराने लंपास केले असावे असे सिद्ध होते .

विद्यापीठातील प्रशासकीय अधिकारी यांनी या झालेल्या प्रकाराची चौकशी करून अशा या चोरीच्या गुन्हयाची पोलीस चौकशी होवून संबंधीता वर फौजदारी गुन्हा दाखल होवून कार्यवाही करण्यात यावी . चोरीस गेलेले जुने सागवाण मटेरीयल गायब केले प्रकरणी संबंधीत इंजिनियरची चौकशी करण्यात यावी . या मागे केलेल्या कामाची चौकशी करून जी कामे या इंजिनियरने केली आहेत सदरच्या साईट वरील जुने डेड स्टॉक मटेरीयल जमा केले की नाही याची शहानिशा करून यांचेवर भा.द.वि.कलम अन्वये कार्यवाही करणेत यावी अशी मागणी स्थानिक नागरीकांमध्ये व कामगारांमधून होत आहे.