चाईल्ड करिअर इंग्लिश स्कूल सलबतपुर मध्ये दहीहंडी उत्सव मोठ्या आनंदात साजरा.
*चाइल्ड करिअर इंग्लिश स्कूलमध्ये दहीहंडी उत्सव साजरा*.
"नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाइल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज "मध्ये दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला. शिस्त ,संस्कार ,गुणवत्ता, संस्कृती आणि खेळ या पंचसूत्री वर आधारित काम करणारी शाळा म्हणून तालुक्यात अल्पावधीत नावारूपास आलेल्या व उपक्रमशील व गुणवत्ता पूर्ण शाळा अशी आगळीवेगळी ओळख असलेल्या शाळेत सर्व भारतीय सण व उत्सव साजरे केले जातात.
बाळ गोपाळ श्रीकृष्ण जन्म निमित्ताने मोठ्या धुमधडाक्यात साजरी केली जाते. दहीहंडी सारखे उत्सव शाळेत साजरे केल्याने विद्यार्थ्यांमधील संघ भावना वाढीस लागते. एकमेकास मदतीची भावना निर्माण होते. व पारंपारिक सण उत्सवाची माहिती मिळते. भारतीय संस्कार व संस्कृतीची रुजवणूक होते. म्हणूनच म्हणूनच शाळेत विविध उत्सव साजरे करण्यात येतात. असे प्रतिपादन शाळेचे अध्यक्ष माननीय श्री सागर बनसोडे सर यांनी केले.
सदर कार्यक्रमात राधा कृष्णाची सुंदर वेशभूषा केलेले विद्यार्थी व विद्यार्थिनी लक्षवेधी ठरल्या. विद्यार्थ्यांनी थरावर थर रचून उंच दहीहंडी फोडली. "गोविंदा आला रे आला "या गाण्यावर नृत्य करत दहीहंडीचा आनंद लुटला. सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी..शाळेचे प्राचार्य श्री संदिप खाटीक,संजय गरुटे,अभिजीत आरगडे,अमोल इंगळे,विजय खाटीक, छाया निकम,सुप्रीया लिंबे,मयुरी लोखंडे, जाधव मावशी,अशोक मगर यांनी परीश्रम घेतले.
सदर कार्यक्रमात पालक व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थीत हो
ते.