राहुरी शहरामधील खंडेराया देवस्थान येथे चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली

राहुरी शहरामधील खंडेराया देवस्थान येथे चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली

राहुरी तालुका प्रतिनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

राहुरी तालुक्याचे ग्रामदैवत असलेले खंडेराया देवस्थान येथे चंपाषष्ठी उत्साहात साजरी करण्यात आली

देव दिपाली पासून चंपाषष्ठीपर्यंत खंडेरायाचा उत्सव साजरा केला जातो या चंपाषष्ठीला दरवर्षीप्रमाणे खंडेराया देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने मंदिरामध्ये विद्युत रोषणाई केली जाते आणि दरवर्षीप्रमाणे वांग्याचे भरीत बाजरीची भाकरी असा प्रसाद येणाऱ्या सर्व भक्तांना दिला जातो आणि त्या रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम मंदिरामध्ये आयोजित केला जातो या रात्री सर्व खंडेरायाचे व सर्व देवी देवतांना गाणे आरती म्हणून प्रसन्न केले जाते

तसेच सर्व लोक हिंदू धर्माच्या नियमाप्रमाणे चंपाषष्ठीला सर्वांच्या घरात खंडेरायाची तळी भरली जाते हे सर्व करण्या अगोदर सर्व लोक नैवेद्य घेऊन खंडेराया देवस्थान येथे जातात व मन भावनेने पूजा करतात व एकमेकांच्या घरी जाऊन तळी भरण्याचा कार्यक्रम करतात या तळीमध्ये प्रसाद म्हणून वांग्याचे भरीत कांद्याची पात बाजरीची भाकर असा नैवेद्य देवाला दाखवला जातो आणि पाच लोक मिळून खंडेरायाची तळी भरतात आणि जे भक्त तळी भरायला येतात त्यांना प्रसाद म्हणून वांग्याच चे भरीत कांद्याची पात बाजरीच्या भाकरीचा प्रसाद विड्याच्या पानावरती  दिला जातो  याप्रकारे चंपाषष्ठी साजरी केली जाते