तेलकुडगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक हनुमाननगर शाळेत ग्रामपंचायत अंतर्गत स्वच्छ भारत मिशन घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित.
*जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर शाळेत ग्रामपंचायत तेलकुडगाव ता. नेवासा जिल्हा अहमदनगर अंतर्गत 'स्वच्छ भारत मिशन' घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प कार्यान्वित*.
नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हनुमाननगर या शाळेत स्वच्छ भारत मिशन योजने अंतर्गत शाळेला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प (कचराकुंडी) चे बांधकाम करण्यात आले. अत्यंत चांगल्या पद्धतीचे बांधकाम झाले. यानिमित्त ग्रामपंचायत तेलकुडगाव सरपंच श्री.बालकनाथ काळे पा. श्री. सतिशराव काळे पा. व ग्रामपंचायत विद्यमान उपसरपंच श्री. अशोक काळे पा., माजी सरपंच श्री. सुरेश काळे पा., माजी सरपंच एकनाथराव घोडेचोर पा., ग्रामपंचायत सदस्य श्री. शरद काळे पा. माजी चेअरमन ज्ञानेश्वर काळे पा. दत्तात्रय काळे पा. बाबुराव काळे पा. माजी सरपंच काकासाहेब काळे पा. श्री. बाबासाहेब काळे(सर), श्री.भानुदास गटकळ पा. श्री. दत्तात्रय गुंजाळ(माजी केंद्रप्रमुख) या सर्वांचे शाळेच्या वतीने आभार मानण्यात आले.
या वेळी हनुमाननगर शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. लक्ष्मण काळे पा. उपाध्यक्ष श्री. शंकर गायकवाड, सदस्य श्री दिपक घाडगे, श्री मच्छिंद्र घोडेचोर, श्री दिपक काळे, श्री रामचंद्र काळे,श्री. निलेश घाडगे, श्री. राहुल काळे, श्री संदीप काळे, श्री. गोवर्धन काळे, श्री राजेन्द्र गटकळ,श्री.ज्ञानदेव गायकवाड, श्री. पांडुरंग वाकचौरे, श्री. सोमनाथ लिपणे, श्री. अशोक शिंगेटे, श्री नवनाथ नवघरे, श्री सुशील घाडगे, आदी उपस्थित राहून केलेल्या कामाचे कौतुक केले.
शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती हंडाळ मॅडम यांनी सर्वांचे स्वागत केले व शाळेच्या भौतिक सुविधा पूर्ण होण्यासाठी ग्रामपंचायत कार्यकारिणी ला विनंती केली. शेवटी श्री रविराज चौरे सर यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.