नेवासा तालुक्यातील आदर्श बालाजी देडगाव येथील ग्रामपंचायत च्या वतीने स्व.उत्पन्नातून मागासवर्गीय, महिला, दीव्यांग कल्याण निधीचे वाटप व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत स्वच्छता मोहिमेस प्रारंभ.
बालाजी देडगाव (प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील
आदर्श गाव बालाजी देडगाव येथे ग्रामपंचायत कडून स्व उत्पन्नातून मागासवर्गीय कल्याण निधी १५%, महिला कल्याण निधी १०% व दिव्याग कल्याण निधी ५% या शासनाच्या नियमानुसार १८ लाभार्थ्यांना २५०० ते ३००० हजार रुपयांचे चेक वाटप करून ग्राम स्वच्छता अभियान मोहिमे ला सुरूवात केली.
हा कार्यक्रम ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे मा.संचालक बाजीराव पाटील मुंगसे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी देडगावचे आदर्श कर्तव्यदक्ष ग्राम विकास अधिकारी संतोष उल्लारे यांनी प्रास्ताविकात हा निधी ग्रामपंचायत स्वउत्पन्नातून दिला जातो .
मागासवर्गीय ,महिला, दिव्यांग या वर्गाना हा निधी शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक ,वैयक्तिक या कामासाठी दिला जातो. जेणेकरून त्यांचे जीवनमान उंचावता येईल समाजातील मागासवर्गीयांचा विकास व्हावा हा आर्थिक दुर्बल घटक समाजाच्या मुख्य प्रवाहात यावा या दृष्टीने हा लाभ दिला जातो .तसेच अपंगांना अपंगत्व कमी करण्यासाठी व कौटुंबिक आधार देण्यासाठी त्यानिमित्ताने त्यांच्या जीवनात नवचैतन्य येण्यासाठी हा अपंगाचा निधी दिला जातो. तसेच महिलांना सक्षम महिला बनवण्यासाठी व छोटा-मोठा घरगुती व्यवसाय करण्यासाठी आधार दिला जातो.जर खेड्यातील महिला सधन झाली तर देशातील महीला सधन होतील हा सर्व दूरदृष्टीचा विचार डोळ्यासमोर ठेवून हा निधी ग्रामपंचायत कडून दिला जातो. अशी माहिती ग्रामसेवक अधिकाऱ्यांनी दिली.
यानंतर देडगावचे विद्यमान सरपंच चंद्रकांत पाटील मुंगसे यांनी हि आपल्या गावातील परिसराचा विकास होण्यासाठी श्री संत गाडगे बाबा स्वच्छता मोहीम व स्वछ भारत मिशन या मोहिमेस आपण सुरुवात करणार आहोत. शासनाच्या१५ वित्त आयोगातून हा विकास करणार आहोत. गावातील घाण, गावातील बाभळीच्या काट्यांनी वेढलेला परिसर स्वच्छ करणे, समुदाईक ठिकाणची स्वच्छता करणे हे कामे करणारं आहोत ज्यां महामानवाने स्वच्छतेचा मंत्र दिला असे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा आदर्श घेऊन आपण वर्षभर स्वच्छता केली पाहिजे. ५०%टक्के आजार हे अस्वच्छता मधून होत असतात .सर्वांनी आपल घर ,आपला परिसर ,आपला गाव स्वच्छ ठेवण्याचा निर्धार करावा असे आव्हान या वेळेस केले.
जवळील बाभळीच्या काट्यांनी वेढलेला परिसर स्वच्छ करण्यासाठी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ फोडून सुरुवात केली.
यावेळी उपस्थित उपसरपंच लक्ष्मणराव गोयकर ,मार्केट कमिटी संचालक कडू भाऊ तांबे, प्रगतशील बागायत बन्सी पाटील मुंगसे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष अजित ससाने ,ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके ,बालाजी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त सुभाष मुंगसे ,विश्वस्त सुनील शेठ मुथा, युवा नेते श्रीकांत हिवाळे, फकीरचंद हिवाळे, ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे, भागचंद मुंगसे साहेब,नंदकुमार मुथा, विलास हिवाळे, साचीन हिवाळे, राहुल तांबे ,डॉ. तिडके, आशिष हिवाळे,गोरख माळी, बाळासाहेब म्हस्के, शिवा ससाणे, संदीप ससाणे, संजू कुटे, गणेश तांबे, व लाभार्थी व देडगाव ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे यांनी मानले.