*भिमजयंती निमित्त प्रहार च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक दान कार्यक्रम संपन्न..!* - आप्पासाहेब ढुस

*भिमजयंती निमित्त प्रहार च्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना पुस्तक दान कार्यक्रम संपन्न..!*   - आप्पासाहेब ढुस

राहुरी फॅक्टरी - दि. १३ एप्रिल 

चला महापुरुषातील जातीभेद नष्ट करू, आणि शिवरायांच्या परिसरात भिमजयंती साजरी करू.. या प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आदेशानुसार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंती निमित्ताने प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने राहुरी फॅक्टरीच्या प्रसादनगर भागातील ६० गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकदान कार्यक्रम संपन्न झाल्याची माहिती प्रहार चे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी दिली. 

       राहुरी फॅक्टरी येथील प्रसादनगर भागातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्याला सकाळी ८.३० वाजता पुष्पहार अर्पण करून लगत असलेल्या जिल्हापरिषद प्राथमिक शाळेत कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी सनदी अधिकारी दत्तापाटील कडू हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय जल पुरस्कार प्राप्त पत्रकार शिवाजी घाडगे, प्रहारच्या राहुरी फॅक्टरी शहर अध्यक्ष रजनी कांबळे, उपाध्यक्ष अफसाना शेख, वंदना कांबळे, सचिव लैला शेख, प्रभाकर कांबळे, विजय कुमावत, शरद वाळुंज, पुंड काका, मुख्याध्यापिका श्रीमती फरजाना सय्यद मॅडम, शिक्षिका श्रीमती शुभदा पवार मॅडम, शिक्षक श्री अतुल गोसावी सर यांचेसह प्रसादनगर भागातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

       प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष दत्ता पाटील कडू यांनी या उपक्रमाचे स्वागत करून अश्या पद्धतीने समाजउपयोगी कार्य हाती घेऊन महापुरुषांची जयंती साजरी होताना पाहून आनंद व्यक्त केला व ज्या डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी शिका आणि संघटित व्हा हा संदेश दिला त्यांच्याच भिमजयंती निमित्ताने पुस्तकदान कार्यक्रम ठेवल्याने खऱ्या अर्थाने डॉ बाबासाहेबांचे कार्य लोकांपर्यंत पोहचविणेचा संदेश प्रहारने दिला त्याबद्दल प्रहार संघटनेचे व अध्यक्ष नामदार बच्चूभाऊ कडू यांचे आभार मानले. 

     प्रसंगी मान्यवरांचे हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर, आणि सरस्वती प्रतीमा पूजन करून सर्व विद्यार्थ्यांना पुस्तके आणि खाऊ वाटप करणेत आला. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी केले तर आभार राहुरी फॅक्टरी शहर महिला अधक्ष्या रजनिताई कांबळे यांनी मानले.