मावा व गुटख्या पायी वाया गेली तरुणाई प्रशासनाला याची परवाच नाही.

मावा व गुटख्या पायी वाया गेली तरुणाई प्रशासनाला याची परवाच नाही.

प्रतिनिधी संभाजी शिंदे खेडले परमानंद तालुका नेवासा

9604490993

कॅन्सर होवून माणसे मेली तरी कायग्याने बंदी असलेल्या गुटख्याची तस्करी माञ नेवाशात सुरुच...

तालुक्यात सर्वत्र प्रत्येक गावात मावा व गुटखा विक्री सर्रासपणे प्रत्येक दुकानात खुलेआम होत आहे.

प्रत्येक सार्वजनिक ठिकाणी थुंकून -थुंकून भिंती रंगून गलीच्छ वातावरण निर्माण होत आहे.

गुटखा तस्करांवर पोलिस आवळणार का ? फास...

मावा व गुटखा सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर आजार जडून गुटख्याच्या आहारी गेलेले अनेक युवक अल्पवयात यमसदनी जात असतांनाही गुटखातस्करी करणारे नेवासाशहरासह तालुक्यात दिवसा ढवळ्या संडे हो या मंडे ? बिनदिक्कतपणे खुलेआम मावा - गुटखा चढ्या भावाने विकत असल्यामुळे शहरासह तालुक्यात गुटखा तस्करी करणाऱ्या मोहरक्याला आता पोलिस कायद्याचा बडगा उगारणार का ? असा संतप्त सवालही जनतेतून उपस्थित होतांना दिसून येत आहे.

  गुटखा विक्री नेवासा शहरासह तालुक्यात राजरोसपणे सुरु अाहे माञ चढ्या भावाने काळ्याबाजारात गुटख्याचा पुरवठा करणाऱ्या तस्करांचे मोठे जाळे निर्माण झालेले असतांना सद् रक्षणाय...खलनिग्रहणाय.... ब्रिद वाक्याचे नेमऩुकीच्या ठिकाणी तंतोतंत पालन करणाऱ्या पोलिस दादांना काळ्याबाजारातील गुटखातस्करी करणाऱ्या मोहरक्याला पोलिल मुद्देमालासह कधी गजाआड करणार ? असा सवालही आता जनतेतून विचारला जावू लागली आहे

   गुटखा सेवनामुळे दरवर्षी तोंडाच्या कॅन्सरमुळे मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींचे प्रमाण सर्वाधिक आहे.गुटखा,तंबाखू तसेच तंबाखूमिश्रित सुगंधी सुपारीमुळेही हा आजार वाढत चालला आहे.सर्वसामान्यांच्या आरोग्यावर होणारे हे दुष्परिणाम लक्षात घेता कायद्याने गुटखा बंदी असली तरी नेवासा शहरासह तालुक्यात सर्वञ चढ्या भावात गुटखा विक्री चालु असून गुटख्याचा पुरवठा करणारा मोहरक्या माञ पोलिसांना मिळून येत नसल्याने सर्वसामान्य जनतेतुन पोलिसांच्या भूमिकेबाबत आश्चर्याबरोबरच आता चिडही व्यक्त होवू लागली आहे.

   नेवासा शहरासह तालुक्यात छुप्प्या पद्धतीने काळ्या बाजारात चढ्या भावाने गुटखा विक्री करणाऱ्या तस्कराच्या मुसक्या पोलिसांनी आवळण्याची गरज निर्माण झाली अाहे कायद्याने बंदी घातलेल्या काळ्या बाजारातील गुटख्या विक्री करणाऱ्या तस्कराला कायद्याचा धाक दाखवून फास आवळण्याची गरज निर्माण झाली आहे हा गुटखातस्कर खुलेआमपणे प्रशासनावरच आगपाखड करुन पैसे फेकले का ? सगळ मिटतय ? असे म्हणून 'चोर तर 'चोर माञ पुन्हा शिरजोर' हा तस्कर होत असूनही पोलिस यंञणा या तस्करांपुढे नेमक्या नांग्या का टाकते ? असा सवालही जनतेतून उपस्थित केला जात आहे.