पिंप्री अवघड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. मिनाक्षी लांबे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

पिंप्री अवघड ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सौ. मिनाक्षी लांबे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

*पिंपरी अवघड च्या सरपंच पदी सौ.मीनाक्षी लांबे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड

       राहुरी तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अग्रगण्य असलेल्या पिंपरी अवघड ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माजी सरपंच सौ.मीनाक्षीताई सुरेशराव लांबे यांची दुसऱ्यांदा बिनविरोध निवड करण्यात आली,त्यांना सूचक विद्यमान उपसरपंच बापु उर्फ लहानु तमनर हे होते तर अनुमोदक माजी सरपंच सौ परवीनबानो शेख,सौ रेखा पटारे,शिवाजी लांबे यांनी अनुमोदन दिले, नवनिर्वाचित सरपंच सौ मीनाक्षी लांबे यांनी सन 2010/15 या काळात सरपंच पदाच्या माध्यमातून गावात स्मशानभूमी सेड,प्रवेशद्वार कमान,वाडी वस्तीवर रस्ते व पिण्याचे पाणी योजना अशी अनेक भरीव कामे मागील सरपंच काळात केली होती, त्यामुळे अत्यंत उत्साहाच्या वातावरणात ही सरपंच पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली,या सरपंच पदाच्या निवडीसाठी सौ लांबे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध घोषित करण्यात आली, सरपंच पदाच्या निवडणुकीचे कामकाज मंडल अधिकारी विजय बेरड साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली त्यांना कामगार तलाठी तुषार काळे ग्रामसेवक सौ शुभांगी चोखर क्लार्क कृष्णा कांबळे संजय वाघमारे यांनी सहकार्य केले,या प्रसंगी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते,यामध्ये प्रामुख्याने पिंपरी अवघड मुंजेश्वर लोकसेवा मंडळाचे मार्गदर्शक अध्यक्ष माजी सरपंच व प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष शेतकरी नेते श्री सुरेशराव लांबे पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, यावेळी ऋषिकेश लांबे, बादशाह शेख, निलेश लांबे,मोहन लांबे, बबन शेख, तुकाराम शिंगाडे, बाळूभाऊ लांबे, गंगाधर कांबळे, केले. सोमनाथ लांबे, बाबुराव विरकर,कृष्णा लांबे,राजेंद्र लांबे,जयहिंद लांबे,अनिल बर्डे, राजू गायकवाड,मुन्ना शेख, सुभाष कांबळे, गणेश जगधने सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते, नवनिर्वाचित सरपंच सौ. मीनाक्षीताई लांबे यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून त्यांना भावी कार्यास शुभेच्छा देण्यात आल्या,सौ.लांबे यांनी सर्वांचे आभार मानून सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे काम करण्याचे आश्वासन दिले.