शेवगांव येथील खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी पिन्या कापसे दोन साथीदारांसह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांची धडाकेबाज कारवाई.
अहमदनर प्रतिनिधी//
शेवगांव येथील खुनाच्या गुन्ह्यातील सराईत आरोपी पिन्या कापसे दोन साथीदारांसह जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखा,अहमदनगर यांची धडाकेबाज कारवाई.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दि 03/03/2024 रोजी फिर्यादी राजेश गणेश राठोड वय 28 वर्षे, रा. बजरंगनगर, पो. बान्सी, ता. पुसद, जि. यवतमाळ तसेच त्याचे इतर 04 साथीदार यांनी मागील भांडणाचे कारणावरुन पिन्या उर्फ सुरेश भारत कापसे रा. आंतरवली, ता. शेवगांव याचे पिस्टलमधुन फायर केला परंतु त्यास गोळी लागली नाही. त्यावेळी पिन्या कापसे याने त्याचे 7 ते 8 साथीदारांसह फिर्यादी दाखल व साक्षीदार यांचा स्कॉर्पीओ गाडीने पाठलाग करुन त्यांना लाकडी लांडके, लोखंडी रॉड, दगडाने मारहाण केली होती. सदर गुन्ह्यामध्ये जखमी अर्जुन पवार हा औषधोपचारादरम्यान मयत झालेला आहे.
सदर घटनेबाबत शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 191/2024 भादवि कलम 302, 307 वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन आरोपींना अटक करण्याबाबत राकेश ओला साहेब पोलीस अधीक्षक अहमदनगर यांनी पोनि दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना आदेश दिले होते. सदर आदेशानुसार पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार मनोहर गोसावी, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, संतोष खैरे, शिवाजी ढाकणे, जालींदर माने, चापोकॉ/अरुण मोरे यांचे पथक तयार करुन आरोपींची माहिती काढुन आरोपींना ताब्यात घेणेबाबत पथकास सुचना देवुन रवाना केले होते.
वरील पोलीस पथक दिनांक 09/03/2024 रोजी शेवगांव या ठिकाणी जावुन आरोपीची ल माहिती काढत असतांना मा. पोनि श्री दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना सदर गुन्ह्यातील आरोपी नामे नितीन पन्हाळे व आबासाहेब कातकडे दोन्ही रा. शेवगांव हे शेवगांव या ठिकाणी आले असल्याची माहिती मिळाल्याने सदर प्राप्त माहिती पथकास कळवुन आरोपीस ताब्यात घेणेबाबत सुचना दिल्याने पथकाने शेवगांव या ठिकाणी आरोपीची माहिती घेत असतांना दोन इसम शिवाजी चौक, शेवगांव येथे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नांव गांव विचारता त्यांनी त्यांची नावे - 1) नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे वय 37 वर्षे, रा. भगतसिंग चौक, शेवगांव, जि. अहमदनगर, 2) आबासाहेब नवनाथ कातकडे वय 36 वर्षे, रा. ठाकुर निमगांव, ता. शेवगांव असे असल्याचे सांगितले. त्यांचेकडे सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचे सांगितल्याने त्यास पुढील तपासकामी शेवगांव पोलीस ठाणे गु.र.नं. 191/2024 भादवि कलम 302, 307 प्रमाणे या गुन्ह्याचे तपासकामी शेवगांव पोलीस ठाणे येथे हजर करण्यात आले असुन पुढील तपास शेवगांव पोलीस स्टेशन करीत आहेत.
आरोपी नामे नितीन उर्फ बंटी रमेश पन्हाळे हा रेकॉर्डवरील आरोपी असुन त्याचेविरुध्द दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस ठाणे गु.र.नं. व कलम
1 शेवगांव 137/2016 भादवि कलम 395
2 शेवगांव 184/2016 भादवि कलम 457, 380
3 शेवगांव 167/2016 भादवि कलम 395
4 शेवगांव 288/2016 भादवि कलम 461, 380
5 शेवगांव 08/2017 भादवि कलम 457, 380, 34
6 शेवगांव 98/2016 भादवि कलम 394, 34
सदरची कारवाई राकेश ओला पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व सुनिल पाटील साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव उपविभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.