सोनई फाटा येथे पहाटे अज्ञात वाहनाची धडक; बिबट्याचा मृत्यू वनविभागाकडून तत्काळ कारवाई, शवविच्छेदनानंतर अंत्यविधी*

सोनई फाटा येथे पहाटे अज्ञात वाहनाची धडक; बिबट्याचा मृत्यू वनविभागाकडून तत्काळ कारवाई, शवविच्छेदनानंतर अंत्यविधी*
सोनई फाटा येथे पहाटे अज्ञात वाहनाची धडक; बिबट्याचा मृत्यू वनविभागाकडून तत्काळ कारवाई, शवविच्छेदनानंतर अंत्यविधी*

*सोनई फाटा येथे पहाटे अज्ञात वाहनाची धडक; बिबट्याचा मृत्यू वनविभागाकडून तत्काळ कारवाई, शवविच्छेदनानंतर अंत्यविधी*

 राहुरी ता प्रीतीनिधी - डॉ देवेंद्र शिंदे

१५ मार्च राहुरी तालुक्यातील नगर मनमाड महामार्गा लगत असलेल्या सोनई फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत एक बिबट्या गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून वन्यजीव संरक्षणावरील प्रश्न पुन्हा एकदा पुढे आला आहे.

पहाटे दरम्यान शहरातील एक नामांकित डॉक्टर नेहमीप्रमाणे व्यायामासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे जात असताना रस्त्यावर एक बिबट्या गंभीर जखमी अवस्थेत आढळला. परिस्थिती पाहून त्यांनी तात्काळ वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फोनद्वारे याबाबत कळवले. मात्र, वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच बिबट्या त्या ठिकाणाहून निघून गेल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.

दरम्यान, दुपारी सुमारे बारा वाजण्याच्या सुमारास डिग्रस गावचे हेमंत मकासरे, राजू बेल्हेकर विजय शिंदे.बंटी झिने आणि त्यांचे सहकारी महामार्गावरून जात असताना त्यांना रस्त्याच्या कडेला एक बिबट्या मृत अवस्थेत आढळला. त्यांनी तत्काळ वनविभागाशी संपर्क साधून याबाबत माहिती दिली.

सूचना मिळताच वनविभागाचे मुख्यअधिकारी सुनिल साळुंके यांनी वनविभागाचे पथक घटनास्थळी रवाना केले. पथकाने मृत बिबट्याला ताब्यात घेऊन वनविभागाच्या कार्यालयात आणले. तेथे अधिकृतपणे त्याचे शवविच्छेदन करण्यात आले. तपासणी पूर्ण झाल्यानंतर नियमांनुसार त्या बिबट्याचा अंत्यविधी करण्यात आला.

ही घटना वन्यजीव रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण, महामार्गालगत सुरक्षित वनमार्ग नसणे, तसेच अवैध वेगाने धावणाऱ्या वाहनांमुळे निर्माण होणारा धोका याकडे लक्ष वेधते. सोनई फाटा परिसरात यापूर्वीही वन्यप्राण्यांच्या वावराच्या घटना नोंदल्या गेल्या आहेत.