महसूल मंत्री विखे यांच्यासह पटारे व दिनकर यांचा शिवप्रेमींच्या वतीने नागरी सत्कार.

महसूल मंत्री विखे यांच्यासह पटारे व दिनकर यांचा शिवप्रेमींच्या वतीने नागरी सत्कार.

श्रीरामपूर - श्रीरामपूर शहराचे गेल्या 40 ते 50 वर्षाची विकासाकडे वाटचाल सुरू झाली पूर्वीचे सर्व माजी नगराध्यक्ष नगरसेवक यांनी शहरातील प्रमुख मार्गाला वेगवेगळ्या नावे द्यायचा नगरपरिषद मध्ये ठराव ही केले त्याच्याच एक भाग शिवाजी रोडला जोडणाऱ्या चार प्रमुख मार्गावरील चौकास छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नाव देऊन त्याची नोंद ही सर्व सरकारी निम  सहकारी व खाजगी दप्तरी केली नगरपालिकेमध्ये वेळोवेळी निवडून आलेल्या सत्ताधाऱ्यांना  शिवप्रेमी नागरिकांनी निवेदने घेरावे  मोर्चेसारखे मोठी मोठी आंदोलने व उपोषणे केली तसेच अनेक शिवप्रेमींवर गुन्हेही दाखल झाले  छत्रपती शिवाजी महाराज चौकात  महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची  मागणीने जोर धरला  सत्ताधाऱ्यांनी पुतळा बसविणार सरकारकडे प्रस्ताव पाठविला आहे असे सांगितले तर या चौकात पुतळा  बसविण्यास एका समाजाचा विरोध आहे अशी चर्चा पसरवली गेली माझी खासदार संभाजी राजे यांनी शहरात येऊन सर्व समाजाची एकत्र बैठक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज चौकात पुतळा बसविण्यास विरोध असल्याची चर्चा निष्फळ असल्याचे जाहीर केले त्याच वेळेस मुस्लिम समाजानेही छत्रपती शिवाजी महाराज चौकात  महाराजांचा पुतळा बसविल्यास त्यांच्या चौथर्‍याचा  संपूर्ण खर्च करणार असल्याची जाहीर केले यावेळी चौकामध्ये पुतळा बसणार व चौकामध्ये पुतळा बसणार नाही अशा विविध प्रकारचे राजकारणही यावेळेस मोठ्या प्रमाणात झाले आता छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाराजांचा पुतळा  

बसावा अशी लाखो शिवप्रेमींची मागणी होती या मागणीची दखल घेऊन माजी सभापती दीपक पटारे व विधानसभा प्रमुख नितीन दिनकर यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून  सर्व सरकारी खात्याची परवानगी आणून  महाराजांचा नवीन पुतळा उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात निधीही आणला छत्रपती शिवाजी महाराज चौकात  मोठ्या उत्साही वातावरणामध्ये सरला बेट चे महंत रामगिरी महाराज व महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते भूमिपूजनाचा  कार्यक्रम संपन्न झाला  गेल्या अनेक वर्षाची शिवप्रेमींची मागणी पूर्ण झाल्याने शिवप्रेमी नागरिकांच्या वतीने महंत रामगिरी महाराज,महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील दीपक अण्णा पठारे, नितीन दिनकर यांचा जाहीर नागरी सत्कार कामगार नेते नागेश भाई सावंत, आपचे नेते तिलक, डुंगरवाल, तालुकाध्यक्ष  विकास डेंगळे, गोरख जेधे, गणेश छल्लारे, निलेश राशिनकर, राहुल रणपिसे, संजय गांगड, भरत डेगळे  राजेंद्र भोसले, अमोल सावंत, संतोष डहाळे, किशोर खरात, सलीम शेख, भैरव मोरे, प्रशांत कटके, मुबारक शेख, युवराज घोरपडे, मनोज गाडे, किरण डेंगळे, डॉक्टर सचिन थोरात, प्रशांत बागुल, अमोल नवगिरे, गवारे मिस्तरी, किशोर खरात, पप्पू जेठे, भागवत बोंबले, प्रवीण लबडे, शंकर तुपे, शिवा मोरे, श्रीराम दळवी, सोमनाथ अभंग, ज्ञानेश्वर कलापुरे, अक्षय गिरमे, अभिजीत राऊत, सचिन आजगे, जयेश पाटील, मनोज शिंदे, सोनू कांबळे, संदीप शिनारे, नारायण पवार, राहुल लुक्कड, देवराज मुळे, मोहन तेलोरे, महेश कौटाळे, मनोज बोंबले, अभिजीत मोरे, संतोष काळे, यावेळी अनेक शिवप्रेमी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या सर्वांच्या वतीने करण्यात आला.चाळीस वर्षानंतर शिवप्रेमींच्या मागणीला यश आल्यामुळे श्रीरामपूर शहरातील तसेच तालुक्यातील नागरिकांमध्ये खरोखर मोठ्या प्रमाणामध्ये आनंद उत्सव साजरा झाला यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्याची  अतिशबाजी झाली