गणेश चतुर्थी निमित्त गणेश भक्ताकडून महापावन गणपतीस ५१ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट अर्पण.

गणेश चतुर्थी निमित्त गणेश भक्ताकडून महापावन गणपतीस ५१ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुकुट अर्पण.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे माका, पाचुंदा, म. ल. हिवरा परिसरातील महापावन गणपती देवस्थान येथे गणेश जयंती निमित्त गणेश भक्त शिवाजी मुरलीधर मुंगसे यांच्या कडून ५१००० हजार रुपये किमतीचा गणपतीस चांदीचा मुकुट अर्पण करतात आला.

     प्रथम सौ. अर्चना व शिवाजी मुरलीधर मुंगसे या दाम्पत्याच्या हस्ते चांदीचा मुकुट अर्पण करून अभिषेक घालण्यात आला.

        यावेळी दानशूर व्यक्तिमत्व सौ. अर्चना व शिवाजी मुरलीधर मुंगसे व प्रगतशील बागायत शेतकरी मुरलीधर मुंगसे यांचा देवस्थान अध्यक्ष संभाजी मुंगसे, विश्वस्त अशोकराव मुंगसे , भाऊसाहेब मुंगसे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

    या वेळी पावन गणपती च्या सभा मंडपात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थानी ह भ प सुकदेव महाराज मुंगसे होते. यावेळी देवस्थानचे विश्वस्त अशोक मुंगसे, चंद्रभान कदम, ज्येष्ठ पत्रकार बन्सीभाऊ एडके यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

       या कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणुन बालाजी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ मुंगसे, जनार्दन तांबे, पांडुरंग रक्ताटे , चांगदेव तांबे, बहिरणाथ एडके, लक्षण मुंगसे, संजय मुंगसे, भगवान् मुंगसे, भागवत दीक्षित,

विनायक पंडित, वसंत ससाणे, बन्सी मुंगसे, अतुल देवा तांदळे सचिन मुंगसे, रमेश काजळे, संदीप मुंगसे ,हेल्थ वेलनेचे बाबासाहेब मुंगसे आदी बजरंग दलाचे सदस्य व आदी मान्यवर व गणेश भक्त उपस्थित होते.

यावेळी सर्व गणेश भक्तास व मान्यवरास महापावन गणपती देवस्थानच्या वतीने महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला होता.

      या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार युनूस पठाण यांनी केले तर आभार ग्रामपंचायत सदस्य अशोक मुंगसे यांनी मानले.