साकुर भागातील अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करावी - डॉ. जयश्रीताई थोरात..

साकुर भागातील अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा  करावी - डॉ. जयश्रीताई थोरात..

 संगमनेर :- साकुर भागातील अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या निषेधार्थ आणि गुन्हेगारांना कठोरातील कठोर शिक्षा करणेबाबत आज एकविरा फाऊंडेशन व जयहिंद महिला मंचच्या वतीने डाॅ. जयश्रीताई थोरात यांनी पोलीस उपअधीक्षक मा. श्री. सोमनाथ वाकचौरे यांची भेट घेऊन निवेदन दिले. सदर घटनेतील आरोपींवर तातडीने कडक कारवाई करावी, अशी मागणी डाॅ. जयश्रीताई थोरात यांनी यावेळी केली.

               याप्रसंगी महिला आयोगाच्या सदस्या उत्कर्षाताई रूपवते, सौ. अर्चनाताई बालोडे, सौ. पदमाताई थोरात, सौ. निर्मलाताई गुंजाळ, सौ. बेबीताई थोरात, सौ. सुरभी पवार, सौ. सुनिताताई कांदळकर, सौ. ललिताताई शिंदे, सौ. नैनाताई राहणे, सौ. गिताताई थोरात, कु. कृष्णा औटी, सौ. किरण गुंजाळ व आदि उपस्थित होत्या.