कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांची शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कालिकादेवी संस्थानला सदिच्छा भेट .

कसबा विधानसभा मतदार संघाचे आमदार हेमंत रासने यांची शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त कालिकादेवी संस्थानला सदिच्छा भेट .

राहुरी 

कसबा (पुणे) विधानसभा मतदार संघाचे आमदार  हेमंत रासने यांनी शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील सोमवंक्षीय क्षत्रिय कासार समाज कालिकादेवी संस्थानला आपल्या सहकार्या सह सदिच्छा भेट देउन समाजाशी संवाद साधला .

यावेळी त्यांनी अहिल्यानगर, राहुरी, श्रीरामपूर, लोणी , श्री क्षेत्र कासारे, अकोला, संगमनेर आदि ठिकाणी भेट दिली या प्रसंगी सो क्ष कासार समाज पुणे विकास आघाडी चे अध्यक्ष रमाकांत कानडे, श्री कालिका देवी संस्थान चे अध्यक्ष अनिल भांडेकर, आनंद डांगरे ,ज्ञानेश्वर रासने रविन्द्र सासवडे, भास्कर अंदुरे आदि उपस्थित होते 

 

या प्रसंगी बोलताना आ . हेमंत रासने म्हणाले निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीने आपल्याला मदत करता येईल त्या पद्धतीने समाज-बांधवांनी पुण्यात येऊन आपली उपस्थिती दर्शवली. त्याच कृतज्ञतेच्या जाणिवेतून स्वतः हा आभार दौरा आयोजित केला व समाज-बांधवांची भेट घेतली.आपल्या समाज-बांधवांना अडीअडचणीच्या वेळी मी आमदार म्हणून खंबीरपणे आपल्या बरोबर उभा राहीन, असे आश्वासन त्यांनी समाज-बांधवांना दिले.  

राहुरी येथील श्री . कालिका मंदिरात राहुरी तालुका कासार समाज बाधवाच्या वतीने आमदार रासने व त्यांच्या सहकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला ,कासार गल्ली येथील श्रीराम गणेश मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी तालुक्यातील समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते .