संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर LCB चा धाडसी छापा, शेकडो गोवंशाची कत्तल ; इतकं हृदयद्रावक दृश्य पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू!
संगमनेरमध्ये कत्तलखान्यावर LCB चा धाडसी छापा, शेकडो गोवंशाची कत्तल ; इतकं हृदयद्रावक दृश्य पोलिसांच्याही डोळ्यात अश्रू!
संगमनेर विशेष प्रतिनिधी : प्रसाद घोगरे: ९३७०३२८९४४.
आज रात्री संगमनेर शहरात मुद्सर कुरेशी याच्या बेकायदेशीर कत्तलखान्यात गायी, वासरे व बैलांची कत्तल सुरू असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर अहिल्यानगर येथील LCB (लोकल क्राईम ब्रँच) पथकाने तातडीने कारवाई करत सदर ठिकाणी छापा टाकला.
छाप्यादरम्यान कत्तलखान्यातील दृश्य अत्यंत हृदयद्रावक होते. एका बाजूला मोठ्या प्रमाणावर कापलेल्या वासरांचा खच आढळून आला, तर अर्धवट कापलेल्या वासरांच्या मध्ये एक जिवंत गाय बसलेली असल्याचे दिसून आले. दुसऱ्या बाजूला मोठ्या गायींच्या मानेवरून धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याचे स्पष्ट दिसत होते. बाजूला मुंडके व मांसाचा मोठा साठा करण्यात आलेला होता.
कत्तलखान्यालगतच्या एका खोलीत सुमारे १० गायी बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्या. तसेच कत्तलखान्याच्या बाहेर दोन पिकअप टेम्पो गोमांसाने भरलेले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. प्राथमिक अंदाजानुसार या ठिकाणी ५०० हून अधिक गायी व वासरांची कत्तल झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
हे सर्व दृश्य पाहून कारवाई करणाऱ्या पोलिसांनाही भावनिक धक्का बसला असून, काही पोलिसांच्या डोळ्यांत अश्रू आल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. सध्या पोलिसांकडून पंचनामा, जप्ती व पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून संबंधितांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
या धाडसी कारवाईबद्दल अहिल्यानगरचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक श्री. घार्गे साहेब, LCB चे पोलीस निरीक्षक श्री. कबाडी साहेब तसेच त्यांच्या संपूर्ण पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

टीप : वरील बातमीची माहिती शिवशंकर स्वामी यांच्या Facebook पोस्टवरून प्राप्त झाली आहे.








