दि २७/११/२०२२ रोजी स्नेहसदन चर्च राहुरी येथे महिला मेळाव्याचे आयोजन .
दि.२७/११/२०२२ रोजी स्नेहसदन चर्च राहुरी येथे महिला मेळावाचे आयोजन चर्चचे प्रमुख धर्मगुरू फा.मायकल राजा यांनी केले.या मेळाव्यासाठी श्रीरामपूर येथील निर्मला ओहोळ ह्या मोठ्या संख्येने महिलाचे बचत गट व महिलासाठी विविध विषयावर मार्गदर्शन करितात.यावेळी त्यानी स्नेहसदन् मधील उपस्थित महिलांना चर्च मध्ये महिला मंडळ असणे बाबत व महिला सबळीकरण व महिला ह्य पुरुषा बरोबरीने अंत्यत उत्कृष्ट कार्य करू शकतात याबाबत अंत्यत अभ्यास पूर्ण व प्रोत्साहन देणारे मार्गदर्शन केले व सर्व उपस्तित महिलां प्रोत्साहीत केले. याच वेळी ऍड. प्रकाश संसारे वारीस्ट वकील.व एन सी डी सी चे महराष्ट्र विभागाचे उपाध्यक्ष यांनी महिला विषयक कायदे व महिलाचे सुरक्षा बाबत असणारे विविध कायदे.शाळेत जाणाऱ्या मुली विवाहित महिला घटस्पोटीत महिला वयस्क महिला बाबतचे कायदे बाबत सविस्तर मार्गदर्शन केले.तसेच जन्म मृत्यू विवाह नोंदणी ही मुदतीच्या आत करणे बाबत आवर्जून सांगितले. फा माथु यांनी चर्चचे धार्मिक कार्यामध्ये महिलाचा सहभाग असणे बाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे मार्गदर्शक निर्मला ओहळ मॅडम व ऍड. प्रकाश संसारे यांचा सत्कार फा.मायकल राजा यांनी बुके देऊन केला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार प्रदर्शन हे सौ ख्रिस्तींना बोर्डे म्याडम यांनी केले या मेळाव्या साठी मर्थाबाई मुन्तोडे परिघाबाई पवार मनिषा मकासरे ज्योति जाधव सह् सडे राहुरी.दिग्रस वांबोरी.खडांबे.राहुरी स्टेशन परिसरातील महिला उपास्तित् होत्या सदरचा मेळावा उत्कृष्ट प्रतीने पार पडल्या बाबत फा.मायकल राजा याचे सर्व उपस्तितानी विशेष आभार मानले.