राहुरी कृषी विद्यापीठ गेट समोरील चहाच्या टपरीवर राहुरी पोलीसांचा छापा
महात्मा फुले कृषी विद्यापीठ गेट समोरील चहा च्या टपरीवर छापा
राहुरी ता प्रती देवेंद्र शिंदे
राहुरी तालुक्यातील विद्यापीठात तंबाखूच्या पुड्या, सिगारेट आणि बिडी यांची विक्री होत असलेल्या एका टपरीवरती राहुरी पोलिस पथकाने 26 जानेवारी रोजी संध्याकाळच्या सुमारास छापा टाकला. यावेळी पथकाने गाईछाप तंबाखूचा मुद्देमाल जप्त करून एकावर गुन्हा दाखल केला आहे. राहुरी तालुक्यातील विद्यापीठ येथील एका टपरीवर तंबाखू पुड्या, सिगारेट आणि बिडी यांची विक्री होत आहे, अशी माहिती 26 जानेवारी रोजी सायंकाळी 5 च्या दरम्यान पोलीस पथकाला मिळाली होती आणि त्यानंतर पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ तसेच पोलीस नाईक गणेश सानप, हवलदार सागर नवले आदी पोलीस पथकाने पंचांना सोबत घेऊन नगर-मनमाड रोडवर महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या गेटच्या समोर येडेश्वरी टी सेंटर (चहाच्या टपरी) वर छापा टाकला. त्यावेळी पथकाने टपरीची तपासणी करून गाईछाप तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला. तसेच तंबाखू विक्री करणाऱ्या आरोपीला ताब्यात घेऊन गजाआड करण्यात आले. पोलीस हवलदार अंबादास गीते यांच्या फिर्यादीवरून आरोपी सागर उर्फ मनोज बबन तड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे टपरी मालकांमध्ये चांगलीच धावपळ उडाली होती, तर अनेक जण टपरी बंद करून यावेळी पसार झाले होते.









