देडगाव येथील अहिल्याबाई होळकर शाळेचे दहावीचे तारे चमकले.
*देडगाव येथील अहिल्याबाई होळकर शाळेचे दहावीचे तारे चमकले.*
बालाजी देडगाव( प्रतिनिधी युनूस पठाण ):- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील अहिल्याबाई होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील SSS बोर्ड साठी 93.96% मार्क मिळवुन विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी निकालाची परंपरा कायम राखली. तर यंदाही मुलींनी बाजी मारली.
विद्यालयात गुण क्रमाने प्रथम कुमारी तेजस्विनी रामचंद्र कदम हिने 90.80% मार्क मिळवून शाळेचे नाव उज्वल केले आहे. तर द्वितीय ताराचंद ज्ञानदेव होंडे याने 86.60 % टक्के मिळवले. तर तृतीय क्रमांक आदित्य एकनाथ टाके याने 85.40% मिळवले तर चतुर्थ क्रमांक ओंकार अंकुश सोनवणे याने 84.40% मिळवले .व पाचवा क्रमांक कुमारी गौरी संभाजी मुंगसे हिने 83.60%टक्के मिळवले.
अहिल्याबाई होळकर शाळेच्या विद्यार्थ्यांनी उत्तुंग भरारी घेतल्याबद्दल त्यांचे मुळा एज्युकेशन संस्थेचे उपाध्यक्ष उदयन दादा गडाख व डॉ. निवेदिता गडाख , मुळा एज्युकेशन संस्थेचे सदस्य बाजीराव पाटील मुंगसे,सरपंच चंद्रकांत मुंगसे तसेच शाळेचे मुख्याध्यापक स्वरूपचंद गायकवाड,
सहशिक्षक ज्ञानदेव कदम सर, दत्तात्रय तोडमल, दसपुते सर, सचिन कोठुळे सर, सुभाष कोलते सर , भुजबळ सर,कृष्णा कोलते सर, गोयकर सर , सुरेंद्र बनसोडे सर, अक्षय मीरपगार सर, ज्योती पंडित मॅडम व आदी शिक्षकांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. तसेच परिसरातूनही कौतुकाचे वर्षाव होत आहे.