गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने संत सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

गुरुवर्य मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने संत सावता महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.

बालाजी देडगाव :-

( प्रतिनिधी युनूस पठाण)नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे श्री संत नामदेव महाराज व श्री संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त गुरुवर्य शांतीब्रह्म भास्करगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे व ह भ प सदाशिव महाराज पुंड यांच्या मार्गदर्शनाखाली आज गुरुवर्य ह भ प मीराबाई महाराज मिरीकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता झाली.

             हा सप्ताह दिनांक १० पासून ते १७ रोजी पर्यंत अतिशय हरिनामाच्या गजरात आनंद उत्सव मध्ये पार पडला. यामध्ये काकडा भजन ,ज्ञानेश्वरी ग्रंथराज पारायण सोहळा ,जागर ,हरिपाठ ,आरती व ह भ प सुखदेव महाराज मुंगसे , ह भ प भागचंद महाराज पाठक, ह भ प रामगिरी महाराज, दादा महाराज वायसळ, महंत ,स्वामी प्रकाशानंदगिरी महाराज, नंदकिशोर महाराज खरात या नामांकित महाराजांची कीर्तने झाली. दररोज सकाळी व सायंकाळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

          तर सप्ताह निमित्ताने गावभर फटाक्याच्या आतषबाजी मध्ये मिरवणूक उत्साहात पार पडली. तर मिरवणुकीमध्ये महिलांच्या डोक्यावरील कलश याचे आकर्षण बनले होते. या मिरवणुकीत नवनवीन जोडप्यांनी व वयोवृद्ध , लहान मुलांनी फुगडी चा आनंद घेत मोठा उत्साह साजरा केला.

         या सप्ताहासाठी बालाजी जय हरी भजनी मंडळ,श्री सावता भजनी मंडळ ,सावता युवा ग्रुप व देडगाव ग्रामस्थांनी सहकार्य करत मोलाचे कष्ट घेतले. या सप्ताहाचे अतिशय सुसज्ज नियोजन व शिस्तप्रिय सप्ताह असल्याने व सर्व जाती, धर्माची उपस्थिती लाभल्याने जिल्हाभरातून कौतुक करण्यात येत आहे.