पुणे येथे ठिबक व तुषार सिंचन तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण संपन्न .
*पुणे येथे ठिबक व तुषार सिंचन तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण संपन्न*
*राहुरी विद्यापीठ, दि. 18 सप्टेंबर, 2024*
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील काटेकोर शेती विकास केंद्र, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभाग, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय, एन.सी.पी.एच., नवी दिल्ली व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, साखर संकुल, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय ठिबक व तुषार सिंचन तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण वर्गाचे आयोजन साखर संकुल येथे करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक डॉ. सचिन डिंगरे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणेचे व्यवस्थापकीय संचालक श्री. मंगेश तिटकारे, फलोत्पादनाचे कृषि उपसंचालक श्री. संजय गुंजाळ, एमसीडीसीचे प्रशिक्षण विभाग प्रमुख श्री. दिगंबर साबळे, मनुष्यबळ विकास तथा वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी श्री. हेमंत जगताप, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, पुणेचे राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार श्री. सचिन मोरे, कृषि महाविद्यालय, पुणे येथील प्राध्यापक श्री. चौधरी व श्रीमती मंदाकिनी पाटील, काटेकोर शेती विकास केंद्राचे श्री. रंजन पांडे उपस्थित होते. या एक दिवसीय प्रशिक्षणाचे आर्थिक सहाय्य एन.सी.पी.एच., भारत सरकार, नवी दिल्ली यांच्याकडून करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. हेमंत जगताप यांनी तर आभार श्री. रंजन पांडे यांनी मानले. या प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यातील 32 प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.