नेवासा तालुक्यात चांदा येथ तलवार बाळगणारे दोन इसम सोनई पोलीसांच्या ताब्यात

नेवासा तालुक्यात चांदा येथ तलवार बाळगणारे दोन इसम सोनई पोलीसांच्या ताब्यात

तलवार बाळगणारे दोन इसम सोनई पोलीसांच्या ताब्यात

खेडले परमानद प्रतिनिधी//

 दि. 30 गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की चांदा येथे दोन इसम त्यांच्या जवळ तलवार बाळगुन गुन्हा करण्याच्या बेतात आहे . अशी खात्रीलायक बातमी मिळाल्याने सपोनि माणिक चौधरी यांनी सोनई पोलीस स्टेशनचे अंमलदारांना सदर ठिकाणी जावुन खात्री करून कारवाई करण्याचे आदेश दिल्याने सदर ठिकाणी जावुन बातमीतील नमुद इसमांना खात्री करुन जागीच पकडुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव 

१ ) शकुर अकबर शेख वय 40 वर्ष रा.चांदा ता. नेवासा

२ ) संदीप गोविद जावळे वय-37 वर्षे रा. चांदा ता. नेवास असे सांगून त्यांचे कब्जात प्रतेकी एक तलवार मिळुन आल्याने त्यांना त्यांचे कब्जात मिळुन आलेल्या तलवार कोठुन तसेच कोणत्या कामासाठी आणलेले आहे . याबाबत त्याचेकडे विचारपुस केली असता त्यांनी सदरची तलवार त्यांचेच असल्याचे कबुल केले .त्यावरुन सदर इसमावर कायदेशीर गुन्हा दाखल करुन पुढील कार्यवाही करत आहोत. 

 

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक श्री.राकेश ओला , अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.सुनिल पाटील

यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि माणिक चौधरी हेड कॉन्स्टेबल मच्छिंद्र आडकित्ते पोलिस नाईक सोमनाथ झांबरे , पोलिस नाईक वजीर शेख , पोलिस कौनस्टेबल विठ्ठल थोरात यांनी केली.