महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या उर्वरित प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यासाठी मुंबई मंत्रालय येथे मा. महसूलमंत्री यांच्या दालनात बैठक संपन्न .
*महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीच्या उर्वरित प्रकल्पग्रस्त यांना सेवेत सामावून घेण्यासाठी मा. महसूलमंत्री यांच्या दालनात मंत्रालय, मुंबई येथे बैठक संपन्न.*
*दिनांक ११/१०/२०२२ रोजी मंत्रालय, मुंबई या ठिकाणी मा. ना. कृषिमंत्री श्री. अब्दुल सत्तार साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व मा. ना. श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब, महसूल मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या उपस्थितीत महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या उर्वरित प्रकल्पग्रस्तांना सेवेत सामावून घेण्यासाठी बैठक पार पडली, या बैठकीसाठी कृषी विभागाचे प्रधान सचिव श्री. एकनाथ डवले, महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेचे संचालक डॉ. कदम, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य श्री. दत्ता पानसरे, कृषि विभागाचे उपसचिव श्री. बाळासाहेब रासकर, कृषीविभागाचे अवर सचिव श्री. उमेश चंदिवडे, विद्यापीठाचे कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे, राहुरीच्या विकासमंडळाचे अध्यक्ष श्री. रावसाहेब (चाचा) तनपुरे, राहुरीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. धीरज पानसंबळ, श्री. प्रफुल्ल शेळके तसेच प्रकल्पग्रस्त कृती समितीच्या वतीने अध्यक्ष श्री. संतोष पानसंबळ, उपाध्यक्ष श्री. विजय शेडगे, सचिव श्री. सम्राट लांडगे, सदस्य श्री. अक्षय काळे, श्री. सुरेश पवार उपस्थित होते. यावेळी प्रास्ताविक प्रकल्पग्रस्त कृती समितीचे सचिव श्री. सम्राट लांडगे यांनी केले. बैठकीमध्ये विद्यापीठ प्रकल्पग्रस्त यांना सेवेत सामावून घेण्यासाठी विविध विभागांशी चर्चा करण्यात आली. चर्चेअंती मा. कृषिमंत्री महोदय, महाराष्ट्र कृषी शिक्षण परिषद व कृषी विद्यापीठ यांनी उर्वरित प्रकल्पग्रस्त यांना सेवेत सामावून घेण्याचे आश्वासन दिले, बैठक मा. ना. महसूल मंत्री तथा अहमदनगर जिल्हा पालकमंत्री श्री. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच बैठक आयोजित करण्यासाठी श्री रावसाहेब (चाचा) तनपुरे यांनी विशेष प्रयत्न केले.*