इंडसड बँकेच्या खातेदारांचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून अपहार करणारी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद .

इंडसड बँकेच्या खातेदारांचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून अपहार करणारी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद .

*इंडसड बँकेचे बनावट क्रेडिट कार्ड तयार करून फसवणूक करत सर्व सामान्य नागरिकांचे cibil खराब करणारी टोळी राहुरी पोलिसांकडून जेरबंद*

 

 

               सदर घटनेची हकिकत अशी की दि.10/2/2024 रोजी फिर्यादी नामे किरण बाजीराव चिंधे टाकळीमिया तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यामध्ये नमूद आरोपीने फिर्यादीचा मोबाईल क्रमांक वापरून फिर्यादीचे पॅन कार्ड वरील संपूर्ण नाव पॅन कार्ड नंबर ,जन्मतारीख, बनावट ई-मेल आयडी ,राहण्याचा पत्ता ,फिर्यादीचे नावावर बनावट तयार करून इंडसंट बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून त्याद्वारे एकूण 83000/- रुपयांचा अपहार केलेला आहे. सदर गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून नमूद गुन्हातील आरोपीत यांना अटक करण्यात आली आहे.1) नवाब उर्फ सोनू हबीब सय्यद वय 30 धंदा बँक फायनान्स रा महादेव वाडी ता.राहुरी,2) असलम उर्फ भैय्या चांद पठाण वैयक्तिक धंदा सुपरवायझर नूरानी मध्ये राहुरी,3) कारभारी देवराम गुंड वय 28 रा.महादेव मंदिरा शेजारी कुक्कडवेढे राहुरी,ह मु. प्लॉट नंबर 147 गावटे नगर घुले नगर मांजरी बु.ता. जि.पुणे यांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे. 

 

           नमुद आरोपी कडे अधिक विचारपुस व चौकशी करीता एखादे व्यक्तीचे आधार कार्ड व पॅन कार्ड प्राप्त केल्यानंतर त्यावरील माहिती मोबाईल मधील एप्लीकेशनच्या माध्यमातून कशाप्रकारे बदलण्यात येते याची माहिती दिली व पुणे येथील साथीदार यांच्याशी ऑनलाईन व फोनवरून ओळख करून देऊन बनावट बनविलेल्या आधार कार्ड वरील पत्ता मोबाईल नंबर ईमेल बनवून त्याद्वारे कोणत्याही बँकेचे क्रेडिट कार्ड प्राप्त करून क्रेडिट कार्ड वरून कशाप्रकारे पैसे काढून आर्थिक फायदा मिळवता येतो याची माहिती दिली आहे. परिणामी ज्याच्या नावाने क्रेडिट कार्ड काढलेले आहे त्याला या गोष्टीचा कुठलाही थांग पत्ता नसतो परंतु तो जेव्हा बँकेत लोन काढण्यासाठी जातो त्यावेळी त्याला त्याचे सिबिल खराब झालेले आहे असे समजते. अशाप्रकारे बराच लोकांची आधार कार्ड पॅन कार्ड वापरून त्यांच्या नावाने क्रेडिट कार्ड तयार करून परस्पर फायदा लाटून सर्वसामान्य नागरिक यांचे सिबिल खराब केलेले असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने अटक आरोपी यांच्याकडे राहुरी पोलीस तपास करत आहे.

 

          तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिकृत बँक एम्पलोयी शिवाय अन्य इसमांकडे आपले आधार कार्ड पॅन कार्ड देऊ नये असे आव्हान करत आहे.

 

             सदर कारवाई राकेश ओला पोलिस अधीक्षक , अहमदनगर, वैभव कलुबर्मे अपर पोलिस अधीक्षक अहमदनगर, बसवराज शिवपूजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर विभाग जि. अहमदनगर यांच्या मार्गदर्शनाखाली संजय आर.ठेंगे पोलीस निरीक्षक राहुरी पोलीस स्टेशन, चारूदत्त खोंडे पोलीस उपनिरीक्षक, पोहेको/ विकास साळवे, पोहेकों सुरज गायकवाड, पोहेकों राहुल यादव, पोना/ प्रविण बागुल, पोकों/प्रमोद ढाकणे, पोकों/नदीम शेख, पोकों/ शिरसाठ, पोकॉ सचिन ताजणे,पोका गणेश लिपणे,पोको सम्राट गायकवाड, पोकों/अमोल गायकवाड, मोबाईल सेल श्रीरामपुर चे पोना/सचिन धनाड, पोना/संतोष दरेकर, पोहकों/अशोक शिदे, पोकों/ अजिनाथ पाखरे, चापोहेका/शकुर सय्यद यांनी केलेली आहे. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री चारुदत्त खोडे पोलीस उपनिरीक्षक राहुरी, लेखनिक , पोहेका विकास साळवे,पोकों/ ईत्तेकार सय्यद पो.स्टे. हे करत आहेत.