पिंप्री अवघड जिल्हा परिषद शाळेत भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन उत्साहात संपन्न .

पिंप्री अवघड जिल्हा परिषद शाळेत भगवान सर्वज्ञ श्री. चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन उत्साहात संपन्न .

पिंप्री अवघड जिल्हा परिषद शाळेत भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन उत्साहात साजरा.

 

         राहुरी तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंप्री अवघड येथे सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी शासन परिपत्रकानुसार भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांचा अवतार दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पिंप्री अवघडचे माजी सरपंच संदिप वसंत लांबे यांच्या हस्ते भगवान श्री.चक्रधर स्वामींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेतील शिक्षक शिवाजी नवाळे यांनी श्री.चक्रधर स्वामींच्या जयंतीबद्दल माहिती दिली. माजी सरपंच संदिप लांबे यांनी भगवान सर्वज्ञ श्री.चक्रधर स्वामी यांच्या संपूर्ण जीवन कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. यावेळी शाळेतील शिक्षक अनिल पवार यांनी संतांनी दिलेल्या चांगल्या शिकवणूकीची माहिती विद्यार्थ्यांना देऊन ती शिकवणूक आज आपण सर्वांनी आचरणात आणण्याची गरज असल्याचे विशद केले.

 

           कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापक गंगाधर जवरे यांनी आभार व्यक्त केले. जयंतीचा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक अनिल कल्हापुरे , श्रीम. संगिता बेदरे , ज्योती पुरी व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी अश्विनी लांबे यांनी नियोजन केले.