श्रीरामपूर लोयोला सदन येथे, मणिपूर येथील महिलांवरील निंदनीय अत्याचार घटनेचा ख्रिश्चन समाजाच्या वतीने जाहीर तीव्र निषेध व्यक्त ....
श्रीरामपूर:- दि. २१/०७/२०२३ रोजी, श्रीरामपूर लोयोला सदन येथे मणिपूर येथील घटनेचा ख्रिश्चन समाजाच्या वतीने जाहीर तीव्र निषेध व्यक्त केला आहे. मणिपुर येथे महिलांवर निंदनीय अत्याचार झाला . त्याबद्दल ख्रिस्ती बांधवांच्या वतीने या घटनेचा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी समाजातील अनेक मान्यवर तसेच ख्रिस्ती समाज मोठ्या संख्येने उपस्थिती होता मणिपूर सरकारचा जाहीर तीव्र शब्दात निषेध करण्यात आला त्याप्रसंगी लोयोला चर्चचे प्रमुख धर्मगुरू रेव्ह. फादर ज्यो गायकवाड, ऑल पास्टर फेलोशीप संघटनेचे अध्यक्ष पास्टर राजेश कर्डक, तसेच पास्टर अण्णा अमोलिक, पास्टर सुनील बार्शी, सेंट लूक हॉस्पिटलचे सिस्टर जान सिंह, कनोसा सिस्टर्स रिटा व महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष श्री. दीपक कदम, श्री. सुरेश ठुबे, श्री. संजय लोंढे. श्री. अविनाश काळे साहेब, श्री. कमलाकर पंडित, श्री. लेविन भोसले, श्री. विजय त्रिभुवन, श्री. फ्रान्सिस कदम, श्री. राजू साळवे, श्री. रंजीत लोखंडे, जॉन लोखंडे, प्रकाश लोखंडे, संजय दुशिंग, अजितकुमार सुडगे, अक्षय ठुबे, रवी त्रिभुवन, पास्टर भाऊसाहेब आढाव, सुनील आढाव, प्रकाश सावंत सर आणि मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती महिला बंधू भगिनी उपस्थित होत्या. याप्रसंगी महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषद, लोयोला चर्च ऑल पास्टर फेलोशिप व मोठ्या प्रमाणात ख्रिस्ती बांधव उपस्थित होते. निषेध व्यक्त करतांना रेव्ह फा. ज्यो गायकवाड म्हणाले की, भारत हा देश महासत्ता व्हावा म्हणून स्वप्न पहात असतांना मणिपूर घटना आपणास मागे खेचत आहे. ही केवळ ख्रिस्ती समाजाची व्यथा नसुन संपूर्ण मानव जातीची व्यथा या देशात स्त्रियांना याप्रकारे वागणूक द्यावी ही खरोखरच फार दुर्दैवी गोष्ट आहे. देशातील पुजारी यांनी या प्रकारच्या घटनेत जातीने लक्ष देवून याप्रकरच्या घटना यापुढे घडणार नाहीत याची दखल घ्यावी. भारतात सर्व धर्मियना पंथीयांना सारखीच वर्तनुक व न्याय मिळावा व एकमेकांशी आदरयुक्त, चांगली वागणूक मिळावी अशी आम्ही सरकार कडून अपेक्षा करत आहोत . मणिपूर मधील झालेल्या घटनेचा निषेध करतो. मणिपूर ख्रिस्ती महिला व बांधवांवर होणारे अन्याय थांबावावे, त्यांचे झालेले नुकसानभरपाई देवून पुनर्वसन शासनाने करावे आदी प्रश्नांकडे शासनाचे लक्ष केंद्रित व्हावे यासाठी हा जाहीर तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला असे दिसून आले. Delhi91.com bpslive news.... Reporter. .. Deepak Kadam. Shrirampur.