नेवासा शहरातील एकता प्रतिष्ठान मध्ये रंगला खेळ पैठणीचा; उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिलांनी जिंकले बक्षिसे..
नेवासा शहरातील एकता प्रतिष्ठान मध्ये रंगला खेळ पैठणीचा; उत्स्फूर्त प्रतिसाद देत महिलांनी जिंकले बक्षिसे..
नेवासा - शहरात ३६ वर्षांची परंपरा कायम ठेवत, एकता प्रतिष्ठान दर वर्षी नवरात्री उत्सव मोठ्या दिमाखात साजरा करत असतो. दर वर्षी काही तरी नवीन करण्याची या युवा मंडळांची शहरात ओळख असते या वर्षी ही असेच काही पुन्हा सिद्ध करण्यासाठी या युवा मंडळाने जिल्ह्यातील प्रसिद्ध असे बी. जितेंद्र प्रस्तुत होम मिनिस्टर, खेळ पैठणीचा हा संस्कृतिक कार्यक्रम रविवार, दिनांक २२ ऑक्टोबर २०२३ रोजी सायंकाळी आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून माजी सभापती सौ. सुनिताताई गडाख उपस्थित होत्या, कार्यक्रमाची सुरुवात त्यांच्या हस्ते नारळ वाढून करण्यात आली. होम मिनिस्टर - खेळ पैठणीचा या खेळात १००-१५० महिलांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवला. १७-१८ विविध प्रकारच्या खेळाच्या फेऱ्याअखेर एकूण ६ विजेत्या काढण्यात आल्या.
या मध्ये सौ.प्रिया उपाध्ये, सौ.स्वाती गायकवाड,सौ.निर्मला कडू या तिघी पैठणी जिंकून ठरल्या होम मिनिस्टर - खेळ पैठणीच्या मानकरी, तर सौ.वैशाली मापारी यांनी सोन्याची नथ जिंकून द्वितीय पारितोषिक तर सौ.राधिका थोटे यांनी चांदीचे पैंजण जिंकून तिसरे पारितोषिक मिळवले.
तसे बघण्यासाठी आलेल्या महिलांसाठी देखील एकता प्रतिष्ठान तर्फे लकी ड्रॉ ठेवण्यात आला होता. या मध्ये सौ.कुंभकर्ण यांनी चांदीचे नाने जिंकले.
कार्यक्रमात वितरण करण्यात आलेल्या ३ मानाच्या पैठणी बक्षीस म्हणुन वारसा पैठणी, नेवासा फाटा (प्रोपा. राजेंद्र भागवत) या पैठणीच्या दालना तर्फे देण्यात आले होते. तसेच सोन्याची नथ, चांदीचे पैंजन व चांदीचे नाणे न्यू साई मंगल ज्वेलर्स, नेवासा (प्रोपा. अनिकेत सोनार) यांच्या तर्फे देण्यात आले होते.
एकता प्रतिष्ठान प्रणित एकता नवरात्र उत्सव समिती च्या उत्सवाला या वर्षी ३६ वर्ष पूर्ण झाले.३६ वर्षाची परंपरा असलेला शहरातील एक नावाजलेले मंडळ म्हणून एकता प्रतिष्ठान ची ओळख आहेत.हीच ओळख टिकून ठेवण्यासाठी आम्ही सर्व युवा कार्यकर्ते प्रयत्नशील असतात बी.जितेंद्र प्रस्तुत होममिनिस्टर खेळ पैठणीचा या कार्यक्रमासाठी मंडळाच्या सर्व युवा कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतल्या बद्दल त्यांचे मी मनस्वी आभार मानतो तसेच शहरातील सर्व माता भगिनींनी कार्यक्रमास उत्स्फुर्त प्रतिसाद देत कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल एकता प्रतिष्ठान तर्फे नेवासकर माता भगिनींचे आभार.
- अक्षय पंडुरे, अध्यक्ष,
एकता प्रतिष्ठान नवरात्र उत्सव समिती २०२३