गणेशवाडी शिवारात चाळीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..

गणेशवाडी शिवारात चाळीस वर्षीय युवकाची गळफास घेऊन आत्महत्या..
नेवासा तालुक्यातील गणेशवाडी शिवारात चाळीस वर्षीय युवकाची दि.२६ रोजी दुपारी १.२५ गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गहिनीनाथ धोडींराम खेडे वय ४० याने स्वतः च्या उसाच्या शेतातील सागाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची खबर प्रमोद जालिंदर खेडे रा. गणेशवाडी यांनी सोनई पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन अकस्मात म्रुत्यु ची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पो. हे. लबडे हे करत आहेत.