स्व. मंदाबाई बाबासाहेब काजळे यांचे निधन तर उद्या १३ रोजी दशक्रिया विधी ..
*स्वर्गीय मंदाबाई बाबासाहेब काजळे यांचे दुःखद निधन तर उद्या १३ रोजी दहावा*
(प्रतिनिधी युनुस पठाण):- नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथील प्रगतशील शेतकरी बाबासाहेब अण्णा काजळे त्यांच्या पत्नी स्व.सौ .मंदाबाई बाबासाहेब काजळे यांचे निधन झाले. गुरुवार ४ सप्टेंबर रोजी त्यांनी राहत्या घरी आपला शेवटचा श्वास सोडला.

काजळे परिवारातील मंदाबाई जाण्याने परिवारावर व गावावर दुःखाचा डोंगर कोसळला. घरातून गेल्यामुळे त्या कुटुंबाचा आधारवड हरपला त्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांच्या पश्चात पती बाबासाहेब अण्णा काजळे, भाया रामभाऊ अण्णा काजळे, बन्सी अण्णा काजळे तर मोठा मुलगा दिलीप बाबासाहेब काजळे व रमेश बाबासाहेब काजळे नातवंडे, सूना, पुतणे , दिर, जावई, लेक असा मोठा परिवार आहे.
तर दशक्रिया विधी ह भ प भागचंद महाराज पाठक यांच्या कीर्तन सेवेने उद्या दिनांक १३ रोजी महादेव मंदिर देडगाव या ठिकाणी होईल. तर दिनांक १६ रोजी तेराव्याचा कार्यक्रम राहत्या घरी होईल.
प्रा.डॉ. दिलीप काजळे सर व प्रगतशील बागातदार शेतकरी रमेश काजळे त्यांच्या आई होत्या.








