*चोरीच्या गाडया शोधण्यासाठी राहुरी पोलिसांकडून विषेश मोहीमेदरम्यान 3८ विना नंबरप्लेट गाड्यांवर कारवाही*
दिनांक 23/09/2025
राहुरी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये बऱ्याचशा दुचाकी गाड्या ह्या चोरांकडून अल्प दरात विकत घेऊन विना नंबर प्लेट वापरल्या जातात अशी माहिती मिळाल्याने राहुरी पोलीस स्टेशन ने आज दिनांक 23/09/2025 रोजी विना नंबर प्लेट गाड्यांची तपासणी मोहीम हाती घेतली होती.
सदर मोहिमेदरम्यान 38 दुचाकी वाहने विना नंबर प्लेटची आढळून आली त्या वाहनांवर 20,000 रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली असून त्या गाडी मालकाच्या ताब्यात परत नंबर प्लेट बसवून देण्यात आल्या.
राहुरी तालुक्यातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येते की आपल्या दुचाकी चार चाकी वाहनांवर पुढील व मागील दोन्ही नंबर प्लेट बसून घ्याव्यात जेणेकरून विनाकारण दंड भरण्याची वेळ येणार नाही.. तसेच सर्व नागरिकांनी नंबर प्लेट बसवलेले असल्यास चोरीचे वाहन शोधणं सोप होईल.
सदर मोहीम ही माननीय पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे साहेब , अप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाघचौरे साहेब , उपविभागीय पोलीस अधिकारी श्री देवदत्त भवर साहेब यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय ठेंगे राहुरी पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वात पोसई सपतसे पोहेकॉ. संतोष ठोंबरे , पो.हे.काँ.दरेकर होमगार्ड कर्मचारी यांच्या पथकाने केलेली आहे.
नवीन वाहनांवर नंबर प्लेट नसल्याने कारवाई करण्यात आली आहे तसेच सदरील वाहने नंबर प्लेट न लावता शोरूमच्या बाहेर रोडवर आल्याने शोरूम वाल्यांना आरटीओ द्वारे पत्र पाठवून कारवाई करण्यात येईल
तसेच पालकांनी आपल्या अल्पवयीन मुलांना वाहने चालवण्यास देऊ नये. अल्पवयीन मुले वाहन चालवताना मिळून आल्यास त्यांच्या पालकांवर कायदेशीर कडक कारवाई करण्यात येईल.








