खेडले परमानंद च्या मुख्य चौकातील रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

खेडले परमानंद च्या मुख्य चौकातील रस्ता बनलाय मृत्यूचा सापळा

खेडले परमानंद च्या मुख्य चौकातील रस्ता बनला मृत्यूचा सापळा.

       एकीकडे स्वच्छ भारत अभियानाचे लेख लिहिणारी ग्रामपंचायत मुख्य चौकातील सांडपाण्या मुळे रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेकडे दुर्लक्ष करीत आहे.

       ग्राम विकास अधिकारी व ग्रामपंचायत प्रतिनिधी यांना वेळोवेळी सूचना करूनही सांडपाण्याचे व्यवस्थापन न झाल्यामुळे खेडले परमानंद ता.नेवासा जि. अहमदनगर येथील मुख्य चौकातील रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झालेली आहे.

       वाहतुकीच्या दृष्टीने त्याचप्रमाणे नागरिकांच्या दळणवळणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशा चौकातील रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे अनेक दुचाकीस्वार अपघात ग्रस्त झालेले आहेत. लहान मुलांना त्याच प्रमाणे आबालवृद्धांना रस्त्यावर चालणे मुश्किल झाले आहे.

      अनेक वर्षापासून सांडपाण्याचे व्यवस्थापन नसल्याकारणाने रस्त्यावर मोठी गटारी पडले आहेत ,खड्ड्यात रस्ता का रस्त्यात खड्डे हेच कळेनासे झाले आहे. 

    तरी सदर गोष्टीची लोकप्रतिनिधींनी त्वरित दखल घेऊन ही समस्या लवकरात लवकर दूर करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील ये-जा करणाऱ्या नागरिकांकडून होत आहे.