नांदूर शिकारी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ माजी सभापती सुनीता ताई गडाख यांच्या हस्ते संपन
नांदूर शिकारी येथे विविध विकास कामांचा शुभारंभ माजी सभापती सुनीताताई गडाख यांच्या हस्ते संपन्न....
कुकाणा /कुकाणा गटात चांगल्या काम करणाऱ्या लोकांना निवडून द्या, विकास करण्यासाठी आपली संघटना मजबूत करा, आम्ही सदैव तुमच्या सोबत राहु कोणतेही कामे सांगा काम करण्यासाठी गटा तटाचा विचार न करता शेवटच्या घटकाचा विचार ठेऊन प्रामाणिक प्रयत्न करू असे प्रतिपादन नेवासा पंचायतसमितीच्या माजी सभापती सुनिताताई गडाख यांनी नांदूर शिकारी येथे विविध विकासकामांच्या उदघाट्ना प्रसंगी केले.
नांदूर शिकारी येथे मा.नामदार शंकरराव गडाखपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मा.सुनिलभाऊ गडाख सभापती, पशु व संवर्धन विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या विकास निधीतून शाळा खोल्या बांधने एकूण निधी वीस लाख रुपये खर्चाचे तसेच स्मशानभूमी साठी दहा लाख रुपये खर्चाची कामे त्याच बरोबर, मा.उपसभापती राजनंदिनी ताई मंडलिक यांच्या पंचायत समिती विकास निधीतील आरो प्लांट बसवणे अशा विविध विकास कामांचा उदघाटन व भूमिपूजन समारंभ मा.सभापती सुनिताताई गडाख यांच्या शुभहस्ते पार पडला.या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावर प्रमुख उपस्थितीत नेवासा पंचायत समितीच्या माजी सभापती सुनीताताई गडाख,
मा. उपसभापती राजनंदिनीताई मंडलिक,या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा नेते अमोल अभंग हें होते या वेळी ,सरपंच सौ. केसरबाई सरोदे,इजिनिअर बाळासाहेब कचरे,अजित मंडलिक, उपसरपंच संतोष लिपणे, राजेंद्र म्हस्के, सरपंच संदीप देशमुख,अशोकराव गर्जे,उपसरपंच सोमनाथ कचरे ,प्रशांत देशमुख, उपाभियंता पंचायत समिती संजय घुले,शाखा अभियंता विशाल तागड, विलास लिपने, सचिन साबळे, सचिन नागोडे तुकाराम गुंजाळ, मुसाभाई इनामदार, राजेंद्र चव्हाण, ग्रा. पं रोहिदास शिरसाठ, दत्तू टीमकर, शिवाजी लिपने, विश्वनात लिपने, दत्तू राजमाने, गोरख लिपने, सुनील लिपने, भगवान शिरसाठ, सतीश मुळक ग्रामसेवक प्रतिभा पिसोटे आदींसह ग्रामस्थ
उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्तविक प्रा. संदीप शिरसाठ यांनी केले तर आभार भाऊसाहेब उभेदळ यांनी मानले