नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांमुळे होणारा मोठा अनर्थ टळला.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे  पाटबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांमुळे  होणारा मोठा अनर्थ टळला.

नेवासा तालुक्यातील बालाजी देडगाव येथे मुळा चाळीतील अंतरिम वितरिका चारी औ .न .७ जवळ पाटाला छोटे मुगारे पडले होते. परंतु ही बाब ताबडतोब पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्यांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन ही बाब गांभीर्याने घेतली .यावेळी जे सी पी व ट्रॅक्टर याचा उपयोग करून ताबडतोब मुगारे बुजवण्यात आले. हे काम अधिकारी ने युद्धपातळीवर केले.

       जर हे काम अधिकारी ने दुर्लक्षित केले असते. तर लाखो लिटर पाणी वाया जाऊन जवळील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असते. व हंगामी या रोटेशन मध्ये खूप मोठा अडथळा निर्माण झाला असता परंतु या चांगल्या कामांमध्ये अधिकारी ताबडतोब येऊन त्यांनी उत्तम कामगिरी केली.

        या कामगिरीसाठी उपविभागीय अधिकारी लबडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाखाधिकारी स्वप्नील देशमुख साहेब व ज्यांनी मोलाचे कष्ट घेतले संदीप झेंडे साहेब ,अजित,चव्हाण साहेब सहाय्यक बाजीराव जमधाडे साहेब व बालाजी पाणीवाटप संस्थेचे सचिव चंद्रकांत हिवाळे साहेब या सर्व अधिकाराच्या कामगिरीबद्दल देडगाव , तेलकुडगाव व जळगाव परिसरातून कौतुक व अभिनंदन होत आहे.