*राहुरी पोलिसांची धडक कारवाई ऑपरेशन मुस्कान अंतर्गत राहुरी पोलीस स्टेशन हद्दीतील मागील 16 महिन्यात एकूण 80 मुलींचा शोध व पालकांच्या ताब्यात*
24 दिवसापूर्वी अपहरण झालेल्या मुलीचा शोध
-------------------------------*
राहुरी पोलीस स्टेशन येथे गु.र.नंबर 913/2023 भारतीय न्याय संहिता 137(2) प्रमाणे दिनांक 22/08/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. सदर गुन्हयामध्ये अपहरीत मुलीबाबत काहीएक माहिती उपलब्ध्द नसतांना गुप्त बातमीदाराच्या मदतीने व तांत्रिक तपासाद्वारे तसेच अथक परीश्रम घेवुन गुन्हयातील अपहरीत मुलीचा माग काढुन तिचा साक्री, जि धुळे येथे जाऊन शोध घेतला असता ती मिळून अली असून तिला तिच्या वडिलांच्या सोबत राहुरी पोलिस स्टेशन येथे आणून ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक समाधान फडोळ, पो कॉ कांबळे हे करत आहेत.
सदरची कारवाई मा.श्री. सोमनाथ घार्गे सो. पोलीस अधीक्षक अहिल्यानगर , मा.श्री. सोमनाथ वाकचौरे सो. अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर , श्री. जयदत्त भवर सो. उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर उपविभाग जिल्हा अहिल्यानगर यांच्या सुचना व मार्गदर्शनाखाली पो.नि.संजय आर.ठेंगे, पोउपनी समाधान फडोळ, पोउपनी संदीप मुरकुटे, पोहवा राजेंद्र नागरगोजे, पोकॉ रवींद्र कांबळे, मपोकॉ. वृषाली कुसळकर नेमणुक राहुरी पोलीस स्टेशन जि. अहिल्यानगर व पोना सचिन धनाड, नेमणुक अपर पोलीस अधीक्षक सो श्रीरामपुर जि. अहिल्यानगर मोबाईल सेल यांनी केलेली आहे.








