शेवगावातील भूखंड प्रकरण तालुका डेव्हलपर्स असोसिएशनचे तहसीलदारांना निनावी पत्र
शहरातील 55 गट नंबर मध्ये बनावट एन ए .प्रकरणाची वृत्तपत्रातून वाचता होताच तालुका डेव्हलपर्स असोसिएशनने तहसीलदारांकडे तक्रार अर्ज सादर केला मात्र त्यावर कोणाचीही सही नसल्यामुळे नेमके हा अर्ज देणारा कोण आणि त्यातून त्यांना काय निष्पन्न करायचे आहे .याविषयी संभ्रम निर्माण झाला असून त्याबाबत जोरदार चर्चा झडत आहेत .या सर्व प्रकरणातील सूत्रधार कोण आहेत हे शोधावे असे यात भरडल्या गेलेल्या भूखंड धारकाचे म्हणणे आहे .
शेवगाव नगर परिषदेच्या हद्दीत तहसीलदारांच्या बनावट सह्या व शिक्के वापरून अकृषक आदेश तयार करण्याचे प्रकरण गेल्या काही वर्षापासून सुरू आहेत अशा बनावट आदेशाद्वारे भूखंडाची खरेदी विक्री व्यवहार करण्यात आलेले आहेत .यामुळे सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक झाली आहे या सर्व प्रकरणाची चौकशी केली असता 55 गट नंबर मध्ये तहसीलदारांच्या बनावट सही व शिक्का वापरून बोगस एन . ए .ऑर्डर केल्याचे निष्पन्न झाले आहे .त्यानुसार विविध वृत्तपत्रातून सदर प्रकरणाला वाचा फुटली यामुळे खरेदी-विक्री करणारे व्यवसायिक खडबडून जागे झाले त्यांनी ज्यांना भूखंड विकली ते नागरिक त्यांना जाब विचारायला लागले आहेत .
अशा प्रकरणाच्या बनावट बिनशेती आदेशाच्या शेकडो भूखंडाची गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत खरेदी-विक्री झालेली आहे .खरेदी-विक्रीचा व्यवहार करताना दुय्यम निबंधक कार्यालयाने त्याबाबत शहानिशा केली नव्हती का तसेच नोंदीसाठी सदर कागदपत्रे तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडे गेल्यानंतर त्यांनीही याबाबत खातरजमा करायला हवी होती सामान्य माणसाला नोंदीसाठी अनेक चकरा माराव्या लागणार तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयात मात्र या काही ठराविक लोकांकडूनआलेल्या नोंदी दप्तर केल्या जातात त्यामुळे या षड्यंत्राचा तलाठी मंडळ अधिकारी दुय्यम निबंधक कार्यालय व महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचारी यांची मोठी साखळी कार्यरत होती असे म्हणावे लागेल भूखंड खरेदी विक्री व्यवसायिक महसूल अधिकारी कर्मचारी यांच्या संगनमताने जीवनभराचा पुंजी जमा करून ठेवलेले नागरिक भरडले गेले आहेत .शुक्रवार दि .25 रोजी तालुका डेव्हलपर्स असोसिएशनने तहसीलदार यांना निवेदन दिले असून सर्व व्यवहार नियमानुसार झाल्याचा दावा केला आहे .आमची बदनामी थांबवावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा त्यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात दिला आहे .परंतु त्याची पोहोच असलेल्या कागदावर कुणाचेही नाव व सही नाही .त्यामुळे असे निनावी निवेदनावर तहसील कार्यालयाकडून पोहोच कशी दिली जाते असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे .