देशात दिव्यांग मंत्रालय असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य-सुरेशराव लांबे पाटील.

देशात दिव्यांग मंत्रालय असलेले महाराष्ट्र हे पहिले राज्य-सुरेशराव लांबे पाटील.

राहुरी प्रतिनिधी- प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शेतकरी दिव्यांग सर्वसामान्याचे दैवत असलेले आमदार बच्चुभाऊ कडु साहेब यांच्या अनेक वर्षाच्या प्रयत्नाला अखेर यश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे मनापासुन आभार, 

शेतकरी व सर्व सामान्य नागरिकांसाठी लवकरात लवकर असेच ठोस निर्णय घ्यावेत अशी मागणी प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे,यांनी केली

भविष्यात आ.बच्चुभाऊ कडु साहेब यांचा प्रहार जनशक्ती पक्षाच्या बरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील कष्ठकरी शेतकरी व सर्व सामान्य नागरीक दिव्यांग बांधव खंबीरपणे बरोबर राहील्यास आ.बच्चुभाऊ हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील व त्याच वेळेस शेतकरी सर्वसामान्य नागरिकाला खरा न्याय भेटेल असे मत राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रहारचे राहुरी तालुका अध्यक्ष सुरेशराव लांबे पाटील व्यक्त केले,

*गाव-खेड्यांमधील दिव्यांगांना शासकीय योजनांचा लाभ त्वरित मिळण्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये दिव्यांग भवन तथा जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र उभारण्यात येणार,

*दिव्यांग विद्यार्थ्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्तीची रक्कम ही कमी असून ती मागासवर्गीय विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती इतकी करण्यात येईल, 

*अकोला आणि ठाण्याच्या धर्तीवर घरोघरी जाऊन दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणामुळे दिव्यांगांची माहिती संकलित होऊन त्यांना योजनांचा लाभ देणे सुलभ होणार,

*एसटी बस आणि बेस्ट बसमधून प्रवास करीत असताना दिव्यांगांसाठी दिलेले वैश्विक ओळखपत्र ग्राह्य धरणार, दिव्यांगांसोबतच्या व्यक्तींना बस प्रवासात देण्यात येणाऱ्या ५० टक्के सवलत मिळणार,

*खाजगी क्षेत्रांमध्ये दिव्यांगांना नोकरीत आरक्षण देण्यासाठी नियुक्त समितीने दिव्यांगांयोग्य नोकऱ्यांचे वर्गीकरण करण्याच्या सूचना देतानाच वसतीगृहात निवासाची सुविधा न मिळालेल्या विद्यार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ मिळणार,

*ग्रामीण भागात ज्या दिव्यांगांच्या घरी शौचालयाची सुविधा नसेल तिथे शौचालय मिळणार, 

*राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदके मिळविणाऱ्या दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरी देण्याच्या प्रस्ताव सादर केल्याची माहिती स्वतः आ.बच्चुभाऊ कडू साहेब यांनी दिली, या निर्णयाचे स्वागत संपूर्ण राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघातील शेतकरी दिव्यांग बंधु भगिनी कडून होत आहे,

लढा कसा लढावा व यशस्वी कसा करावा हे प्रत्येकाने लोकनायक आ बच्चुभाऊ यांच्या कडुन शिकावे असे मत-प्रहारचे राहुरी तालुकाध्यक्ष सुरेशराव लांबे व्यक्त केले,

f