योगेश सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.

योगेश सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.

योगेश सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश.

प्रतिनिधी :: प्रसाद घोगरे_9370328944

(प्रतिनिधी) देशाचे पंतप्रधान: नरेंद्रजी मोदी व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री: देवेंद्रजी फडणवीस व अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांच्या नेतृत्वाखाली भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष: रविंद्रजी चव्हाण यांच्या हस्ते हिंदुत्ववादी नेतृत्व तसेच आदिवासी नेते: योगेश सूर्यवंशी यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश मुंबई येथील प्रदेश कार्यालयात आदिवासी बंधू- भगिनींच्या मोठ्या उपस्थितीत संपन्न झाला.

योगेश सूर्यवंशी यांनी गेल्या १५ वर्षांत हिंदुत्ववादी नेतृत्व करून अनेक आदिवासी बांधवांचे धर्मांतर रोखले. त्यांनी हिंदूंवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध अनेक आंदोलने, चळवळी यात सहभाग घेऊन आपली आक्रमक भूमिका मांडली आहे. सामाजिक कार्य करत असतांना त्यांनी आता भाजपमध्ये सक्रिय काम करण्यासाठी मुंबई येथे जाहीर प्रवेश केला आहे.

भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष: रविंद्रजी चव्हाण, राज्य संघटन महामंत्री: विक्रांतजी पाटील, प्रदेश कार्यालय प्रभारी: रवीजी अनासपुरे, शेतकरी मोर्चा प्रदेश संयोजक: राहुलजी भोसले, भाजपचे नवनाथजी बन, भाजपा युवा मोर्चा मा.अध्यक्ष:दिपेश ताटकर या मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत आदिवासी नेते योगेश सूर्यवंशी तसेच त्यांच्या बरोबर सौ.अर्चना बर्डे, राहुल दळवी, सोमनाथ माळी, अमोल बर्डे, सुरेश बर्डे, संजय बर्डे, रवींद्र पिंपळे, राकेश माळी, प्रशांत दळवी, अमोल रनाते, सुनील वाघ, विकास शिंदे, ऋषिकेश रुपवते, रुपेश धाकतोडे आदींसह अनेक आदिवासी बंधू - भगिनींच्या मोठ्या संख्येने प्रवेश संपन्न झाला.

या प्रवेशामुळे आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती तसेच
नगरपालिकेच्या निवडणुकीत आदिवासी समाजात भाजपची पकड आणखी मजबूत होणार असून, पक्ष संघटनाला नवीन उर्जा व बळ मिळेल, असा विश्वास या वेळी व्यक्त करण्यात आला.